News

यंदाचा मान्सून वेळेवर आला खरं पण मुसळधार पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वेळेवर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली होती. मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाली आहेत. तर काही ठिकाणी अपुऱ्या पावसामुळे पिके जाळून गेली आहेत.

Updated on 08 September, 2022 1:15 PM IST

यंदाचा मान्सून (Monsoon) वेळेवर आला खरं पण मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे (Kharip Crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वेळेवर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी (Farmers) खरीप पिकांची पेरणी केली होती. मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त (Crops destroyed) झाली आहेत. तर काही ठिकाणी अपुऱ्या पावसामुळे पिके जाळून गेली आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत भरपाई देण्याची मागणी केली आहे. खरीप हंगामातील बाजरी आणि उडीद या पिकाला अपुऱ्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे.

निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रडवताना दिसत आहे. खरीप हंगामातील तूर (Tur) या पिकावर वांझ रोगाचा (Infertility disease) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कर्जत जामखेडमध्ये (Karjat Jamkhed) तुरीचे उत्पादन मोठ्या पमाणात घटण्याची शक्यता आहे.

दिलासादायक! तेलबियांचे उत्पन्न वाढले, मोहरीच्या उत्पादनात 29 टक्क्यांनी वाढ, आता दर होणार कमी

२१ हजार हेक्टरवरील तुरी पिकाचे नुकसान होण्याचा धोका वर्तवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रोहित पवार सध्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. तसेच रोहित पवारांकडून शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. रोहित पवारांनी पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची मागणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटून केली आहे.

lumpy disease: पशुपालकांनो सावधान! हजारो जनावरे लम्पी आजाराच्या विळख्यात

तसेच आता ‘पोकरा’ योजनेमध्ये विदर्भासोबतच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कमी पावसाच्या भागाचाही समावेश करावा, याबाबत देखील भेटीत चर्चा झाली. यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या:
या फळझाडांच्या लागवडीतून मिळेल बक्कळ पैसा! काही वर्षांतच व्हाल श्रीमंत
7th Pay Commission: फिटमेंट फॅक्टरवर मोठे अपडेट! कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

English Summary: Rohit Pawar's struggle to get crop insurance for loss-affected farmers
Published on: 08 September 2022, 01:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)