शेतकरी शेतात कष्ट करू आपले पिकं घेत असतो. असे असताना त्यांच्या उत्पादनाची बाजारात विक्री होईपर्यंत, त्याच्या टोळ्याला डोळा नसतो. अनेकजण नुकसान करण्यासाठी तयारच असतात. आता असेच काहीसे घडले आहे. सध्या कांद्याला बाजारभाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवून ठेवला आहे.
असे असताना आता या कांद्यावर युरिया मिश्रीत पाणी टाकले आहे. त्यामुळे संपूर्ण कांदा नासला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना लोणवाडे शिवारात घडली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात इसमाचा पोलिस शोध घेत आहेत. यामुळे याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.
कांदा उत्पादक शेतकरी तुषार भुसे (रा. सोयगाव, मालेगाव) यांनी यावर्षी यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले आहे. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक ठेवला होता. असे असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कांदा चाळीत युरिया हे रासायनिक खत टाकल्याने संपूर्ण कांदा खराब होण्याला सुरुवात झाली.
जुन्नरच्या हापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! GI मानांकनाबाबत शरद पवारांकडून आश्वासन
यामुळे त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. याबाबत भुसे यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
साखर निर्यात बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जगातील सर्वात श्रीमंत गाव भारतात, प्रत्येकाच्या खात्यावर आहेत १५ लाख रुपये, वाचा श्रीमंतीचे कारण...
सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती करखान्यानी त्यांच्या कार्यक्षेत्राजवळ असणारी गावे त्यांच्या हद्दीत जोडावीत
Published on: 26 May 2022, 04:45 IST