सध्या पीएम किसान सन्मान योजनेतील (PM Kisan Sanman Yojna) अपात्र लाभार्थ्यांची वसुली थकीत आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. असे असताना आता पात्र नसतानाही ज्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्याकडून वसुली करण्याचे (Central Government) केंद्र सरकारचे धोरण आहे. यामुळे प्रशासन कामाला लागले आहे. असे असले तरी शेतकरी त्यांच्यापुढे एक पाऊल गेले आहेत.
आता अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेच्या खात्यावर पैसेच ठेवलेले नाहीत. त्यामुळे वसुली करता येत नाही. यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. महसूल आणि (Agricultural Department) कृषी विभागाने योग्य प्रकारे यंत्रणा न राबवल्यामुळे (PM Kisan Sanman Yojna) पीएम किसान सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची वसुली थकीत आहे. असे असताना आता ‘सोशल ऑडिट’ केले जाणार आहे.
या योजनेमध्ये अपात्र असूनही लाभ घेणाऱ्यांच्या याद्या गाव पातळीवर प्रसिध्द करुन त्याची संपूर्ण माहिती घेऊन वसुली केली जाणार आहे. यामुळे प्रशासनाने देखील पूर्ण तयारी केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे. यामुळे आता तरी वसुली होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवाय यापूर्वीच गाव पातळीवर शिबिरे राबवून शेतकऱ्यांमध्ये या योजनेबद्दल जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र याचा मोठा काही फरक पडला नसल्याचे दिसून आले आहे. ही योजना अल्पभूधारक किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी योजना आहे. असे असताना मात्र यामध्ये अनेकांनी याचा लाभ घेतला आहे.
राज्यात लाखो असे अपात्र शेतकरी आहेत ज्यांनी आयकर अदा करुनही लाभ घेतला आहे. त्यामुळे आता ही रक्कम वसुल करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा राबवली जात आहे. यामुळे तसे नियोजन केले आहे. आता कृषी विभागाचे अधिकारी स्थानिक पातळीवर जाऊन ‘सोशल ऑडिट’ करुन या रकमेची वसुली करणार आहेत. यामुळे याची चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या;
22 मार्च रोजी 'जागतिक जल दिन 2022' निमित्त कृषी जागरणने वेबिनारचे आयोजन, जाणून घ्या काय असेल खास..
'बीडमध्ये तब्बल ४०० एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्यांनी करायचं तरी काय?'
काय सांगता!! आता शेतकऱ्यांसाठी महावितरणचे अधिकारी रस्त्यावर, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
Published on: 20 March 2022, 04:46 IST