ऊस दरासह इतर अनेक मागण्यासाठी सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ऊस तोडणी मुकादमांच्या आर्थिक फसवणुकीमुळं ऊस वाहतूकदार (sugarcane transporter) अडचणीत आले आहेत. त्यामुळं गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळानं मजुरांची जबाबदारी घ्यावी अशी मागणी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.
ते म्हणाले, यावर्षी शेतकऱ्यांना पैसे देऊन देखील कारखान्यांकडे अतिरीक्त ज्यादाचे पैसे शिल्लक राहिले आहेत. अनेक कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात इथेनॉलचं उत्पादन केलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत. ज्या कुटुंबामध्ये एक लाख टन ऊसाचं गाळप केलं जातं, त्याचा कुटुंबप्रमुख जर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रमुख असेल तर हे ऑडीट नीट होईल का? असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
तसेच हे जर मोडून काढायचं असेल तर पुन्हा नव्यानं संघर्षाला सुरुवात करावा लागेल. आपण जर आता संघर्ष नाही केला तर काळ आपल्याला माफ करणार नाही, असेही ते म्हणाले. तसेच ऊस दरावरून देखील येणाऱ्या काळात संघर्ष होणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारांचा मोर्चा काढण्यात आला.
ब्रेकिंग! फॉस्फरस-पोटॅश खतांवर अनुदान मिळणार, सरकार शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते देणार
यावेळी शेट्टी बोलत होते. मुकादमांच्या आर्थिक फसवणुकीमुळं वाहतूकदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक वाहतूक दारांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, ऊस हंगामात मुकादम आणि ऊसतोड मजुरांकडून ऊस वाहतूकदारांची दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते.
Farmer: डाळींबाच्या शेतीतून 20 लाखांचे उत्पन्न; पैठणच्या शेतकऱ्याने करून दाखवले..
यावेळी शेट्टी बोलत होते. मुकादमांच्या आर्थिक फसवणुकीमुळं वाहतूकदार मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक वाहतूक दारांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केल्या असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान, ऊस हंगामात मुकादम आणि ऊसतोड मजुरांकडून ऊस वाहतूकदारांची दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते.
यावर्षी देखील कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजारहून अधिक ऊस वाहतूकदारांना मुकादम आणि ऊसतोड मजुरांनी गंडा घातला आहे. यामधून मारणारीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत. यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एका वाहतूकदाराचा खून झाल्याची घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या;
तुमच्याकडे 10 पैशांची ही नाणी आहेत का? एका मिनिटात मिळतील लाखो रुपये..
"वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर मोर्चा काढला पाहिजे, त्यांना काय संशोधन केलं ते विचारलं पाहिजे"
या 5 पिकांची पेरणी नोव्हेंबरमध्येच करा! वेळेवर उत्पादन मिळेल, बंपर कमाई होईल
Published on: 06 November 2022, 09:40 IST