News

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस पासवान यांची शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी देशातील अन्न प्रक्रिया उद्योगातील पायाभूत सुविधांबाबत अनेक विषयावर चर्चा केली. सध्या शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहे.

Updated on 24 August, 2022 2:37 PM IST

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस पासवान यांची शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी देशातील अन्न प्रक्रिया उद्योगातील पायाभूत सुविधांबाबत अनेक विषयावर चर्चा केली. सध्या शेतकरी अनेक संकटांचा सामना करत आहे.

यामुळे राजू शेट्टी यांनी काही मागण्या केल्या आहेत. देशामध्ये प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या २८ क्लस्टरना जी. एस. टी मधील सवलत देण्यात यावी. शिवार ते ग्राहक शेतीमाल विक्रीसाठी देशामध्ये धान्य व भाजीपाला साठवणुकीचे क्षमता वाढविणे.

जिल्हानिहाय पिकांची प्रतवारी करून प्रकिया उद्योगांना चालना देण्यासाठी करण्यात आलेली आर्थिक तरतूद तूटपूंजी असून ती वाढविण्यात यावी. तसेच महाराष्ट्रात आंबा, कांदा, कडधान्य व तेलबियांवर मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया, द्राक्ष, संत्रा, डाळिंब, काजू, स्टॉबेरी, टॉमेटो, ऊस, दुग्धोत्पादन, मासेमारी, कुक्कटपालन यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे उत्पादन ही महाराष्ट्राची ओळख आहे.

धक्कादायक! बकरा कापत असल्याचे स्वप्न पाहता पाहता स्वत:चे गुप्तांग कापले, शेतकरी रक्तबंबाळ

वाढलेल्या महागाईमुळे या प्रकल्पांच्या किमतीत वाढ झाल्याने अनुदानाची रक्कम वाढवून बजेटमधून तरतूद वाढविण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे आता केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

महत्वाच्या बातम्या;
विधानभवनासमोर राडा! आई बहिणीवरून शिवीगाळ, आमदारांच्यात हाणामारी...
'शहाजीबापू पाटील यांनी आमदारकी निवडणूक लढवण्यासाठी 20 लाख रुपये घेतले होते, मात्र परत केले नाहीत'
Sugarcane FRP; एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही, ऊस उत्पादकांसाठी किसान सभेचा मोठा निर्णय

English Summary: Raju Shetty insists selling farm produce consumers Shivar, demand Modi government
Published on: 24 August 2022, 02:37 IST