News

बीजमाता राहिबाई पोपेरे यांनी खूप मोलाचे कार्य केले आहे. सेंद्रीय शेतीचा आदर्श जनमाणसात पोहोचवण्याचे काम मोठं काम राहिबाई पोपेरे यांनी केले आहे. शिक्षणाची संधी न मिळालेली व्यक्ती शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे पवार म्हणाले.

Updated on 10 May, 2022 2:26 PM IST

बीजमाता राहिबाई पोपेरे (Beejmata Rahibai Popere) यांनी खूप मोलाचे कार्य केले आहे. सेंद्रीय शेतीचा आदर्श जनमाणसात पोहोचवण्याचे काम मोठं काम राहिबाई पोपेरे यांनी केले आहे. शिक्षणाची संधी न मिळालेली व्यक्ती शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे शरद पवार म्हणाले. जर आज आण्णा असते तर त्यांनी शाबासकीची थाप राहिबाईंच्या पाठीवर दिली असती असेही शरद पवार म्हणाले.

बीजमाता राहिबाई पोपेरे यांचा शरद पवार यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचेही शरद पवार यांनी कौतुक केले. कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्या पुण्यतिथी निमित्त रयत शिक्षण संस्था सातारा याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

साखर निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर : शरद पवार

राज्यात साखरेचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी 40 हजार कोटीची साखर परदेशात निर्यात झाली. यात महाराष्ट्राचा एक नंबरचा वाटा आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.

साखर निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, शेतकऱ्यांनी कष्ट केले. कारखानदारी उभी राहिली. उत्तम प्रकारचा ऊस पिकवला. पण ही कारखानदारी चालवण्यासाठी आवश्यक असणारा शिक्षीत वर्ग गावोगावी उभं करण्याचं काम आण्णांनी (कर्मवीर भाऊराव पाटील) यांनी केले. त्यामुळेच कारखानदारी उभी राहू शकल्याचे शरद पवार म्हणाले.

शेतातील दगड गोट्याचे टेंशन विसरा; आली 'ही' मशीन, दोन तासात बाजूला करता येणार दगड गोटे

अध्यक्ष शरद पवार पुढे म्हणाले, मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातून हजारो कोटी रुपयांचा माल आपण निर्यात करु शकलो. त्यामुळे शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना आपण संपन्न करु शकलो असे शरद पवार यावेळी म्हणाले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शैक्षणिक दालन अण्णांनी उभे केलं. सर्वसामान्यांना शिक्षण हे सुत्र कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वीकारले होते असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

गाडी घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; भारतीय Tata Nexon कार आता CNG मध्ये उपलब्ध, जाणून घ्या किंमत

कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त रयत शिक्षण संस्था सातारा याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली.

कोरोनाच्या संकटातही रयत शिक्षण संस्थेने चांगले काम केले. कोरोना संकटातही ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम त्यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध चांगली कामे आपण हाती घेत असतो. या देशातील वेगवेगळ्या संस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो.

1 लाख विद्यार्थी यांना नोकरी मिळणार

एका फ्रेंच कंपनीमध्ये 1 लाखापेक्षा जास्त लोक काम करतात. त्याचे हेडक्वॉटर पुण्यात आहे. त्या कंपनीशी आपण करार केला आहे. त्या कंपनीचे लोक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. तसेच 1 लाख विद्यार्थी सेवेत घेण्याचे त्यांनी कबूल केले असल्याचे पवार यावेळी म्हणाले.

पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? या विषयी पंजाबराव डख यांनी सांगितली महत्त्वाची माहिती...
10 रुपयांची नोट 2 लाख रुपयांना विकते; जाणून घ्या विकण्याची सोपी पद्धत

English Summary: Rahibai Popere conveyed the ideal of organic farming to the masses: Sharad Pawar
Published on: 10 May 2022, 02:26 IST