राज्यात नुकतेच भाजपचे सरकार स्थापन झाले असून भाजपची ताकद वाढली आहे. देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री देऊन त्यांचे पंख छाटले जात असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता त्यांना महत्वाची मंत्रीपदे देण्यात आली आहेत. तसेच आता केंद्रात देखील त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपच्या (BJP) सर्वोच्च संसदीय मंडळ व केंद्रीय निवडणूक समिती (सीईसी) यांची फेररचना करण्यात आली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सीईसीत समावेश करून पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना 'चलो दिल्ली' चा मेसेज दिल्याचे स्पष्ट आहे.
विशेष म्हणजे यामध्ये नितीन गडकरी यांनी स्थान देण्यात आले नाही. यामुळे आता केंद्रात फडणवीसांचे स्थान वाढत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. अनेक राज्यात त्यांनी जबाबदारी फत्ते केली आहे.
काय ते कार्यकर्त्यांवरच प्रेम!! उदयनराजेंचा नादच खुळा, कार्यकर्त्याला तोंडाने भरवला पेढा..
फडणवीस यांना दिल्लीत हलविण्याची ही पहिली पायरी आहे. राज्यातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारमध्ये फडणवीसांच्या इच्छेविरूध्द उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. यामुळे आता २०२४ मध्ये फडणवीस यांना लोकसभा निवडणुकीत उभे करण्याचे पक्षनेतृत्वाने ठरविले असल्याचीही चर्चा आहे.
पन्नास खोके एकदम ओक्के! अधिवेशनात विरोधकांच्या घोषणेची राज्यात चर्चा..
त्यांच्यासाठी मतदार संघाचाही विचार सुरु आहे. फडणवीस यांना पुण्यासारख्या भाजपसाठी सुरक्षित असलेल्या मतदारसंघातून लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचीही चर्चा आहे. यामुळे आगामी काळात चित्र स्पष्ठ होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
Nashik: नाशिकच्या शेतकऱ्याचा इस्राईल पॅटर्न! मत्स्यपालनातून होतेय लाखोंची कमाई..
मोदी सरकारची मोठी घोषणा! आता कृषी कर्जावरील व्याजात मिळणार मोठी सूट
Farming Technique: आता करा जमिनीखाली आणि जमिनीवर दुहेरी शेती, ही पद्धत अवलंबल्यास मिळेल बक्कळ पैसा..
Published on: 18 August 2022, 09:58 IST