कोंबड्या पालन गावरान, घरगुती फिरत्या कोंबड्या पालन व्यवसाय व्यवसाय हा शेतीला जोड व्यवसाय ग्रामीण भागात केला जातो. त्या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. कारण बॉयलर कोंबड्याच्या तुलनेत गावरान कोंबड्याला भाव जास्त आहे.
किंबहूना बोकडाच्या मटनापेक्षा जास्त भाव असल्याचे पाहण्यास मिळते. सध्या आषाढी चालू आहे, गावातील ग्राम देवाच्या यात्रेचे दिवस. त्यात बाजारातून बोकड-कोंबडे आणून देवाच्या नावाने कापून पाहुणचार केला जातो.
सध्या श्रावण महिना सुरु होण्यास १० दिवस बाकी आहे. त्यात या वर्षी अधिकचा महिना आला आहे. त्यामुळे पुढील दोन महिने मांसाहार करता येणार नाही. त्यामुळे कोंबड्याना मागणी वाढलेली आहे. आठवडी बाजारावर हातावरील पोट असणारे अनेक छोटे व्यापारी आहेत.
मोठी बातमी! चिंदरमध्ये विषबाधेने ४१ जनावरांचा मृत्यू...
ते व्यापारी आठवडी बाजारात सकाळी लवकर जाऊन शेतकऱ्यांकडून शेतमाल, शेळ्या, कोंबड्या खरेदी करणे आणि पूर्ण बाजार भरला असता, १०० ते २०० रुपये नफा घेऊन विकणे. आशा दोन्ही घटकांमुळे भाववाढ झालेली आहे.
नव्या शेततळ्यांसाठी ४६ कोटींचा निधी, शेतकऱ्यांना होणार फायदा
यामध्ये गावरान कोंबड्या पाळणाऱ्या व्यवसायाला चांगले दिवस आहेत. गावरान कोंबड्यांच्या सामान्य रोगांच्या विरोधात उत्तम प्रतिकार क्षमता आणि मुक्त संख्येत संगोपनासाठी जुळवून घेण्यास सक्षम असून चवीला अतिशय चवदार असतात.
कृषिमंत्री होताच धनंजय मुंडे यांचा कामांचा धडाका! शेतकऱ्यांसाठी घेतले अनेक निर्णय..
कौतुकास्पद! महिला बचत गटाने उभारला सामूहिक गोठा..
गुवत्तेमुळे शंभर रोपवाटिकांची मान्यता रद्द, शेतकऱ्यांना फसवणे आले अंगलट...
Published on: 17 July 2023, 02:25 IST