News

भारत हा कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Farming Sector) अवलंबून आहे. यामुळे देशातील सरकार (Government) शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करत असतात.

Updated on 06 May, 2022 12:39 PM IST

भारत हा कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती क्षेत्रावर (Farming Sector) अवलंबून आहे. यामुळे देशातील सरकार (Government) शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करत असतात.

2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने (Modi Government) देखील शेतकरी हितासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. यापैकी पीएम किसान सम्मान निधि योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojna) ही एक महत्त्वाकांक्षी योजना (Government Scheme) आहे.

या योजनेअंतर्गत देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये एकूण तीन टप्प्यात किंवा हफ्त्यात दिले जातात. या योजनेअंतर्गत आतापर्यंत दहा हफ्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. देशातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तुम्हीही पीएम किसानच्या पुढील हप्त्याची वाट पाहत असाल तर लवकरच तुमची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु तुम्ही सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीएम किसानची ईकेवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नसेल, तर तुमचा हप्ता थांबू शकतो. म्हणून, 11व्या हफ्त्यासाठी eKYC लवकर पूर्ण करा.

महत्वाच्या बातम्या:

खरं काय! वयाच्या 84 व्या वर्षी मनकर्णा आजीबाई शेतीतुन मिळवतात लाखोंच उत्पन्न; नवयुवकांना लाजवणारी 'तरुण' आजीची भन्नाट कथा

मानलं लेका! परदेशात शिक्षण घेतलं अन मायदेशी परतल्यावर शेती सुरु केली; आज लाखोंचे उत्पन्न

हाती आलेल्या माहितीनुसार, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11 वा हप्ता 15 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसानचा 11 वा हप्ता मिळविण्यासाठी EKYC पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मे आहे.

या योजनेच्या पात्र सर्व शेतकरी बांधवांनी ही प्रक्रिया शेवटच्या तारखेपूर्वी पूर्ण करावी लागणार आहे. जेणेकरुन त्यांच्या खात्यात पीएम किसानच्या पुढील हप्त्यात कोणताही अडथळा येणार नाही. मात्र जर eKYC करूनही तुमचा हप्ता मिळाला नाही, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधु शकतात.

हप्ता न मिळाल्यास या नंबरवर संपर्क साधा

मित्रांनो जर केवायसी करून देखील आपणास या योजनेचा हप्ता मिळत नसेल तर आपण खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधून तक्रार नोंदवू शकता.

»पीएम किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

»पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक: 155261

»पीएम किसान लँडलाइन क्रमांक: 011— 23381092, 23382401

»पीएम किसानची नवीन हेल्पलाइन: 011-24300606 किंवा 0120-6025109

»सरकारने जारी केलेल्या क्रमांकाव्यतिरिक्त, तुम्ही ई-मेल आयडीद्वारे संपर्क साधूनही मदत मिळवू शकता. ईमेल आयडी आपण पीएम किसान सम्मान निधि योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील प्राप्त करू शकता.

English Summary: PM Kisan Yojna: 11th week of PM Kisan to be deposited in bank soon; If you do not receive the money, report to this number
Published on: 06 May 2022, 12:39 IST