गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होत आहे. यामुळे आम आदमी पक्षाने (आप) केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. याचे पडसाद आता संसदेत देखील उमटले आहेत. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी थेट मोदी सरकारला धारेवर धरले आहे.
ते म्हणाले, माझ्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने म्हटले आहे की, 2021-22 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने पेट्रोलचे दर 78 वेळा आणि डिझेल 76 वेळा वाढवले आहेत. यामुळे आर्थिक फटका बसत आहे. यामुळे इतर वस्तू देखील महाग होत आहेत. केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
सध्याच्या सरकारने अटल सरकारपासून धडा घ्यावा, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी एनडीएचे पंतप्रधान होते, तेव्हा सत्ताधारी सरकारसह विरोधकांचाही तितकाच आदर केला जात होता. आता मात्र परिस्थिती वेगळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री रामेश्वर तेली म्हणाले, पेट्रोलच्या किमती 26-6-2010 आणि 19-10-2014 पासून बाजारात निश्चित केल्या गेल्या आहेत.
आता कांदा काढणी मशील ठरतेय फायदेशीर, शाहू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची कमाल
केवळ सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्याच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत योग्य निर्णय घेतात. 16 जून 2017 पासून, तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्री किंमतीमध्ये दररोज सुधारणा लागू केली आहे. असे त्यांनी उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या;
सर्वात लहान शेळी आणि सर्वात जास्त पैसे मिळवून देणारी शेळी, शेतकऱ्यांना होणार फायदा
१४ चा उतारा बसला आणि १० चा बसला तरी समान बाजारभाव का? कष्टकरी ऊस उत्पादकांवर होतोय अन्याय
रामराजे नाईक निंबाळकर भाजपमध्ये जाणार? सातारा जिल्ह्यातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
Published on: 26 July 2022, 03:18 IST