पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलचे दर 22 मे पासून स्थिर होते. आता शिंदे सरकारने राज्यात पेट्रोल प्रति लिटर 5 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी स्वस्त केले आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत मागणी केली जात होती.
तसेच सौदी अरेबियाने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढीचा निर्णय घेतल्याने येत्या काळात पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 22 मेला पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले होते.
दरम्यान राज्यात नवे सरकार सत्तेत येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कपातीची घोषणा केली. त्यामुळे राज्यात पेट्रोल प्रति लिटर 5 रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आता पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे.
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! अखेर शेतकऱ्यांना आता दिवसा वीज मिळणार
आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये असून डिझेलचा दर प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये आहे, तर डिझेलचा भाव प्रति लिटर 92.76 रुपये इतका आहे.
महत्वाच्या बातम्या;
जायकवाडी धरण 60 टक्के भरले, मराठवाड्यातील शेतकरी खुश...
काय सांगता! आता 3 दिवस काम 4 दिवस सुट्टी, वाचा नवीन अपडेट
आता सर्व सोलरपंप अर्जांना मिळणार मंजुरी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Published on: 17 July 2022, 10:58 IST