शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला आहे. ज्यात पाच लाख कुटुंबाचे 12 टप्प्यात आणि 100 प्रश्न तयार करुन हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामधून त्यांनी अंतिम निकष तयार केला आहे.
यामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी प्रती एकर 10 हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निकष या सर्व्हेमधून काढण्यात आला आहे. तर याबाबतचं अहवाल सरकारला देणार असल्याची माहिती सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे.
दरम्यान, अवकाळी तर कधी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील (Marathwada)शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात डोक्यावर झालेलं कर्ज आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे.
काळ्या टोमॅटोपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, जाणून घ्या त्याची लागवड आणि खासियत
केंद्रेकर म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक सर्व्हे केला. ज्यात आमच्या जिल्हाधिकारी यांनी देखील स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माहिती जमा केली. यामध्ये शेतकरी आर्थिक परिस्थित सापडले असल्याचे दिसून येत आहे.
हे सरकार गाई पाळणाऱ्यांना दरमहा देणार पैसे, संस्कृती नष्ट होत असल्याने घेतला निर्णय..
त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रती एकर दिल्यास आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते असे केंद्रेकर म्हणाले. अशाप्रकारे सरकारकडे शिफारस करणारे केंद्रेकर पहिले अधिकारी आहे. यामुळे आता सरकार काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सदाभाऊ खोत मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार
या राज्यातील सरकार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार, लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा
काळा पेरू ठरतोय फायदेशीर, औषधी असल्याने मागणीही जास्त...
Published on: 16 May 2023, 12:04 IST