लष्करी आळी म्हटली म्हणजे शेतकर्यांच्या अंगावर काटाच उभा राहतो. मका पिकाची कर्दनकाळ असलेली अमेरिकन लष्करी अळीने जगभरात थैमान घातले आहे.
या आळीचे भारतातच नव्हे तर दक्षिण आफ्रिका, आफ्रिका आणि आशिया खंडातील अनेक देशातील शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे केले आहे. तिची पिकांवरील फिरण्याची पद्धत व पिकांची नुकसानीची पद्धत पाहिली तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून तिला नियंत्रणात आणणे जवळ-जवळ कठीणच आहे. याच पार्श्वभूमीवर आता ऑक्सीटेक या आंतरराष्ट्रीय संशोधन समूहाने लष्करी आळीचे जीएम नर पतंग विकसित केले आहेत. या तंत्रज्ञानामुळे पुढील पिढीतील मादी पिलांना प्रौढावस्थेत जाण्यापासून रोखले जाऊ त्यांना बाल्यावस्थेतच नियंत्रण करता येणे आता शक्य होणार आहे. जगातील सर्वात मोठा मक्का पिकवणारा देश अशी ओळख असलेला ब्राझील या देशाने या तंत्रज्ञानाच्या चाचण्यांसाठी संमती दिली आहे
हजारो एकर स्तरावरील बीटी मका पिकामध्ये त्याच्या चाचण्या पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा देखील शास्त्रज्ञांनी पूर्ण केला आहे. इंग्लंड मध्ये असणारे ऑक्सीटेक या आंतरराष्ट्रीय संशोधन सोमवारी नवा ऍप्रोच असलेले तंत्रज्ञान जन्मास घालून या आळी वर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. या तंत्रज्ञानामध्ये सेल्फ लिमिटिंग जीन चा समावेश केलेले अमेरिकन लष्करी अळीचे जनुकीय सुधारित नर पतंग विकसित केले आहेत. या पतंगावर आधारित पुढील पिढीतील मादी पिलांना प्रौढा अवस्थेतच जाण्यापासून रोखले जाऊन बाल्यावस्थेतच त्यांचे नियंत्रण केले जाणार आहे.
या तंत्रज्ञानाची परिणामकारकता व निष्कर्ष यांचा अभ्यास करून हे तंत्रज्ञान जगातील अन्य देशांच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्याचा ऑक्सीटेकचा प्रयत्न आहे. (स्त्रोत-ॲग्रोवन)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:शेतीमध्ये आता 'हाच' एकमेव पर्याय, पंजाबराव डख यांनी सांगितले गुपित…
Published on: 27 April 2022, 07:33 IST