News

कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट यामुळे कांदा उत्पादक शेतकरी भरडला जात असून त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे. नुकत्याचं गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच वीस दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला असून कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. कांद्याच्या मागणीत घट झाल्यामुळे कांद्याचे दर देखील खुपच कमी झाले आहेत.

Updated on 19 March, 2022 12:30 PM IST

राज्यातील अनेक शेतकरी कांदा या नगदी पिकाची लागवड करत असतात. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावर अवलंबून आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा समवेत चांदवड नांदगाव या तालुक्यातील बहुतांशी शेतकरी खरीप हंगामातील लाल कांदा तसेच रांगडा व उन्हाळी हंगामात उन्हाळी कांद्याची लागवड करतात.

मात्र गेल्या अनेक वर्षांपासून नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कांद्याचे पीक शेतकऱ्यांसाठी बेभरवशाचे ठरत आहे. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट यामुळे कांदा उत्पादक शेतकरी भरडला जात असून त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावे लागत आहे.

नुकत्याचं गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच वीस दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला असून कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे. कांद्याच्या मागणीत घट झाल्यामुळे कांद्याचे दर देखील खुपच कमी झाले आहेत. कृषी क्षेत्रातील तज्ञांच्या मते आगामी काही दिवसांत कांद्याची मागणी अजून खालावू शकते परिणामी कांद्याच्या दरात मोठी घट घडून येणार आहे.

राज्यातील अनेक बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागली आहे. एकीकडे कांद्याची आवक वाढत आहे तर दुसरीकडे युक्रेन आणि रशिया मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात खंडीत होत आहे. यामुळे कांद्याच्या भावात घसरण नमूद करण्यात येत आहे.

याचा फायदा अनेक भामटे देखील उचलत आहेत अनेक व्यापारी कांद्याची कृत्रिम वाढ दाखवत कांद्याचे भाव कमी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी तीन हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने विक्री होणारा कांदा सध्या 900 ते 1 हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने विक्री होत आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, कांद्याची मागणी कमी आणि आवक जास्त यामुळे कांद्याचे दर कमी होत आहेत. राज्यात तसेच परराज्यात कांद्याचे चांगले विक्रमी उत्पादन झाल्याने सध्या कांद्याची आवक वाढली आहे, आणि युद्धामुळे निर्यातीस अडचणी येत असल्याने कांद्याची मागणी लक्षणीय घटली आहे. यामुळे सध्या बाजारपेठेत कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या:-

आनंदाची बातमी! मोदी सरकार शेतकऱ्यांसमवेत केंद्रीय कर्मचाऱ्यांना देणार होळीचे गिफ्ट; करोडो लोकांना फायदा

महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची निराशा केली; आता पाच तारखेला कठोर निर्णय घेऊ: राजू शेट्टी

मोठी बातमी! इफको अजून 4 नॅनो युरिया प्लांट सुरु करणार; खत टंचाई दुर होणार का?

English Summary: onion rate decreased because of this reason learn about this situation
Published on: 19 March 2022, 12:30 IST