News

नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या लाल कांद्याला 800 ते 900 रुपयांचा दर मिळत आहे. तर उन्हाळी कांद्याला 100 ते 1000 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. यामुळे दर अजून वाढण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत.

Updated on 28 March, 2023 10:47 AM IST

नाशिक (Nashik) जिल्ह्यात कांद्याच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या लाल कांद्याला 800 ते 900 रुपयांचा दर मिळत आहे. तर उन्हाळी कांद्याला 100 ते 1000 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. यामुळे दर अजून वाढण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत.

दरम्यान, कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप तरी कोणत्याही बाजार समितीत नाफेडने (Nafed) कांदा खरेदी सुरु केल्याचे दिसत नाही. राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांन 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान जाहीर केलं आहे. त्याचा हातभार मात्र शेतकऱ्याला लागू शकतो.

शेतकऱ्याच्या कांदा उत्पादनाला नाफेडकडून जास्तीचा भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. मात्र, सध्या बाजार समितीत नाफेडकडून कांद्याची खरेदी सुरु झाली नाही. नाफेडकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरु होईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळात दिली होती.

कारल्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला भाव, शेतकऱ्याला मिळताहेत लाखो रुपये..

असे असताना मात्र, अद्यापही बाजार समितीत कांद्याची खरेदी सुरु करण्यात आली नाही. कांद्याचे दर (onion Price) पडल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी नाफेडकडून (Nafed) कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरु होईल, अशी माहिती विधीमंडळात दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही 12 कोटींचा रेडा पाहण्याचा मोह! शेतकऱ्यांचे केले कौतुक..

असे असताना तसे काही झाले नाही, सातत्यानं कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं नाफेडकडून खरेदी करण्याची मागणी करण्यात येत आहे. नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली नसल्याने समिती आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

गुलाबी बटाट्याच्या शेतीत आश्चर्यकारक नफा, अवघ्या 80 दिवसांत शेतकरी होणार श्रीमंत!
आडसाली ऊस केला तर ३० टनाचे उत्पादन ५५ टनावर निश्चित जाईल, त्यासाठी मानसिकता बदला- अजित पवार
'२ वर्षात राज्यात २२ जिल्हयात १०२५८ मुकादमांकडून ४४६ कोटींची वाहतूकदारांची फसवणूक'

English Summary: Onion price improvement in Nashik, some relief to farmers..
Published on: 28 March 2023, 10:47 IST