News

सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक आमदारांनी बंड करून आसामला गेले आहेत. यामुळे राजकीय अस्थिरता आली आहे. यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. तर काही ठिकाणी अद्यापही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या ठिकाणी पाऊस झालाय, त्या ठिकाणी शेतकरी खरीपाची पेरणी करत आहेत. शेतकऱ्यांची शेतातील कामांची लगबग सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Updated on 25 June, 2022 3:08 PM IST

असे असताना आता मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Mla Devendra bhuyar) हे आपल्या शेतात पेरणीसाठी जमिनीची मशागत करत असल्याचे दिसून आले. सगळ्या राजकीय गरबडीत आता त्यांचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. देवेंद्र भुयार यांनी थेट शेतात जात सारे फाडण्याकरता औत हाती घेतल्याचे दिसले. ते म्हणाले, पहिली शेती, नंतर समाजकारण, राजकारण अशी आमची सामाजिक जीवनातील व्याख्या असल्याचे सांगितले.

सध्या विविध पक्षाचे आमदार मुंबई किंवा बाहेरच्या राज्यात असताना आमदार देवेंद्र भुयार यांनी आपल्या शेतात औत धरल्याचे दिसले. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. पावासाच्या प्रतिक्षेनंतर काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं शेतकरी पेरणीच्या कामाला लागल्याची भुयार म्हणाले. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. शेती ही फार महत्वाची आहे. शेतीत राबणं खूप गरजेचं असल्याचे भूयार म्हणाले.

कारल्यातून लाखोंची कमाई! उत्पादनाबरोबरच वाढीव दराने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस

तसेच ते म्हणाले, मी शेतकरी असल्यामुळे सालाबादप्रमाणे शेतात राबतो. याहीवर्षी मी शेतात पेरणी करत आहे. यावर्षी देखील शेतकऱ्याच्या घरात भरभराटीचे पीक यावं यासाठी वरुणराजाला साक्षी ठेवून आम्ही पेरणी करत असल्याची माहिती भुयार यांनी दिली. दरम्यान, राज्याच्या काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग आला आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता चलन न कापता पाहिजे तिकडे फिरा! ड्रायव्हिंग लायसन्सपासून मिळणार सुटका
कांद्याला प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर का? अमोल कोल्हे यांनी घेतला मोठा निर्णय
"पेरणीसाठी कर्ज द्या, नाहीतर सावकाराकडे शेती गहाण ठेवावी लागेल"

English Summary: On the one hand, the MLA is absconding, but this MLA is on the verge of sowing, the photo is viral
Published on: 25 June 2022, 03:08 IST