सध्यपरिस्थितीला प्राण्यांच्या हल्ल्यात बऱ्याच जणांनी आपला जीव गमावल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या. कधी शेतात काम करताना तर कधी शेतात काम करण्यासाठी जाताना प्राण्याच्या हल्ल्यात नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. विशेषतः शेतकरी बंधूना शेतात काम करत असताना साप व इतर अनेक गोष्टींपासून जीवाला धोका असतो. बऱ्याचदा शेतकरी रात्रीच्या वेळी शेत कामासाठी जात असताना त्यांच्यावर वन्यप्राण्यांचादेखील हल्ला होतो.
काही भागात तर वन्यप्राणांच्या वाढत्या हालचालीमुळे तेथील नागरिकांना धोक्याची घंटा आधीच दिली जाते. मध्यंतरी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघाचा वावर वाढला होता. नागरिकांवर वाघाचे हल्ले सुरूच होते. यात बरेच जण बळी पडले. तसेच गेल्या काही महिन्यांपासून ताडोबा दुर्गापूर, ऊर्जानगर नेरी व कोंडी परिसरात वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रकार वाढले असून यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर बरेच जण जखमी झाले.
त्यामुळे चंद्रपूर वन परिक्षेत्राच्या वतीने आता मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. दुर्गापुरातील वाॅर्ड क्रमांक १ व २ मधील मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने सुमारे एक किमीपेक्षा अधिक अंतरावर १५ फूट उंचीची जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वाघ आणि बिबट्याचा संचार वाढल्याने तेथील नागरिकांत प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी चंद्रपूर वन परिक्षेत्र कार्यालय सज्ज झाले आहे.
यासाठी त्यांनी आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र तरीही झुडपी जंगलामुळे वाघ आणि बिबट्याची दहशत वाढतच आहे. दरम्यान, एका आठ वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी वेकोली व्यवस्थापकाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या घटनेनंतर मात्र वेकोलीने त्या परिसरातील काटेरी झुडपे काढून साफ सफाई केली. आता चंद्रपूर वन विभागानेदेखील मोठे पाऊल उचलले आहे.
शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकार आक्रमक; तब्ब्ल 2 कोटींचे बियाणे जप्त
या कामाची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी पाहणी केली असून याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. यासाठी अनेक आंदोलनही करण्यात आले होते. त्यामुळे वन विभागाने वस्तीभोवती जाळी लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितले. यावेळी सुनील काळे, माजी सरपंच अमोल ठाकरे, रायुकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले, सामाजिक कार्यकर्ते सचिन मांदाळे, राहुल भगत, सौरभ घोरपडे, भोजराज शर्मा आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
तब्बल 4 टर्मपासून साखर कारखाना बिनविरोध, राज्यात केलाय वेगळाच आदर्श निर्माण..
ठाकरे सरकारची पशुपालन योजना; शेतकऱ्यांना मिळतायेत गायी आणि म्हशी
Published on: 12 June 2022, 11:55 IST