News

कृषिपंप हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे उपकरण आहे. याची बिघाड किंवा याची चोरी झाल्यास ते शेतकऱ्यांना परवडत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

Updated on 08 June, 2023 10:46 AM IST

कृषिपंप हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे उपकरण आहे. याची बिघाड किंवा याची चोरी झाल्यास ते शेतकऱ्यांना परवडत नाही. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

असे असताना आता शेतातील स्टार्टर चोरीची चिंताच मिटली आहे. तरुणाने यावर कायमचा उपाय शोधला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्य असलेल्या कुलदीप दिलीप वाघ या युवकाने ओळखली.

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड खु. हे त्याचे मूळ गाव आहे. शेतकरी कुटुंबातील या युवकाने कृषिपंपाचे कार्य सुरळीत चालविण्याच्या दृष्टीने ‘स्मूथ स्टार्टर’ हे उपकरण (डिव्हाइस) तयार केले आहे.

निंबोळी अर्क कसा तयार करावा? निंबोळ्या सध्या पक्व होण्याच्या मार्गावर...

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ॲपमध्ये पंप किती वाजता व किती वेळ सुरू ठेवायचा, कधी बंद करायचा यासाठी ‘टायमर’ची सुविधा आहे.

पुरेसे व्होल्टेज, फेज स्टेट्स, पंपाची स्थिती आदींचीही माहितीही मोबाइलवर उपलब्ध होते. या उपकरणाला ‘एलसीडी डिस्प्ले’ दिला आहे. तापमान नियंत्रणासाठी छोटा फॅन आहे.

व्याजासहित एफआरपी आणि मुदत संपलेली रूपांतरित ठेवी द्या, पृथ्वीराज जाचक यांचे छत्रपती कारखान्याला पत्र..

शेतातील अनेक उपकरणे चोरीस गेल्याचे अनुभव शेतकऱ्यांना येतात. त्या अनुषंगाने पंपाला वीजपुरवठा करणारी केबल कोणी कापली किंवा त्यात छेडछाड केली, तसेच पंप किंवा स्टार्टर चोरीस गेला, तर मोबाईलवर लगेच याची माहिती मिळणार आहे.

जंगल वृद्धीसाठी सीडबॉल निर्मिती कार्यशाळा
तुम्ही कधी पांढरा आंबा पाहिला आहे का, जगातील सर्वात अनोखा वाणी आंबा, जाणून घ्या...
शेती नाही, कृषी क्षेत्रातील या नोकऱ्या तुम्हाला बनवू शकतात लखपती, लाखात आहे पगार, जाणून घ्या..

English Summary: Now the worry of starter theft in the farm is over, the youth has found a permanent solution...
Published on: 08 June 2023, 10:46 IST