राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. सभागृहाचे नियमित कामकाज सुरू असताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव मांडला.
यावर बोगस बियाण्यांच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सध्याच्या कायद्यात बदल करून तो अधिक कडक केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याबाबत अनेकदा शेतकऱ्यांची फसवणूक होते.
बीटी कापूस बियाणे कायद्याच्या धर्तीवर इतर पिकांच्या बियाण्यांसाठीही कायदा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बोगस खतांच्या बाबतीतही दोषींवर कडक कारवाई होण्यासाठी अत्यावश्यक वस्तु कायद्यात खतांचा समावेश करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे, परंतु या गंभीर मुद्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांना न्याय न देता सरकार राजकीय कसरती करण्यात रमले आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
मोठी बातमी! चिंदरमध्ये विषबाधेने ४१ जनावरांचा मृत्यू...
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या केवळ ८० टक्के पेरण्या झाल्या असून काही विभागांत दुबार पेरणीचे संकट असल्याचे फडणवीस यांनी मान्य केले.
पशुधन खरेदीसाठी बँका देतात फक्त ४ टक्के व्याजाने कर्ज, असा करा अर्ज...
गुणवत्तेमुळे शंभर रोपवाटिकांची मान्यता रद्द, शेतकऱ्यांना फसवणे आले अंगलट...
नव्या शेततळ्यांसाठी ४६ कोटींचा निधी, शेतकऱ्यांना होणार फायदा
Published on: 18 July 2023, 11:01 IST