स्वतःचे घर असावे ही प्रत्येकाची इच्छा असते. पण घर बांधणे खूपच खर्चिक बाब झाली आहे. आपल्याला माहित आहेच कि घरबांधणीसाठी लागणारे सगळे मटेरियल्स प्रचंड प्रमाणात महागल्यामुळे घर बांधणे तितकेसे सोपे राहिले नाही. घरबांधणीमध्ये सगळ्यात जास्त खर्च येत असेल तर तो स्टीलवर. परंतु घरबांधणीत आवश्यक असलेल्या स्टीलच्या दरात आणि त्यासोबत घर बांधण्यामधील महत्वाचे सिमेँट आणि वाळुच्या किमतीत देखील मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे.
त्यामुळे या परिस्थितीत घर बांधायचे स्वप्न कमी खर्चात पूर्ण होऊ शकते अशी स्थिती आहे. जर आपण यामध्ये गेल्या आठवड्याभरात असलेल्या दराचा विचार केला तर तब्बल सात हजार रुपयांनी भाव स्वस्त झाले आहेत.
एकंदरीत स्टीलच्या भावाची परिस्थिती
जर आपण बुधवारच्या दराचा विचार केला तर प्रति टन चार ते पाच हजार रुपयांनी स्टील खाली आले आहे. यामध्ये ब्रँडेड बार 67 हजार रुपये प्रति टन आणि स्थानिक ब्रँडचे बार 62 हजार रुपये दराने विकले जात आहेत. त्यामुळे आता घर बांधणाऱ्याना मोठा दिलासा मिळाला असून लोखंड देखील बुधवारी आठवड्याच्या तुलनेत प्रतिटन सात हजारांनी घसरले आहे.
स्टीलचे ताजे दर
सरकारने पोलादावरील निर्यात शुल्कात वाढ केल्यामुळे देशांतर्गत बाजारात स्थिर उत्पादनांच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली असून हेच प्रमुख कारण बारच्या किमती घसरण्यामागे आहे. जर आपण या एकंदरीत झालेल्या घसरणीचा अंदाज लावला तर एप्रिलमध्ये एकेकाळी बारची किरकोळ किंमत 82 हजार रुपये प्रतिटनावर पोहोचली होती, जी आता 62 ते 63 हजार रुपये प्रतिटन झाली आहे.
तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये ब्रँडेड बारच्या किमतीतही प्रतिक्विंटल पाच ते सहा हजार रुपयांनी घट आली आहे. सध्या ब्रँडेड बारची किंमत 92 ते 93 हजार रुपये प्रतिटनवर आली आहे. याच किमतीचा मागच्या महिन्याभरापूर्वीचा विचार केला तर त्यांची किंमत 98 हजार रुपये प्रतिटनावर पोहोचली होती.
Published on: 06 August 2022, 10:39 IST