गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. अखेर आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यांनी बहुमताचा ठराव देखील जिंकला. यामुळे आता राज्यात शिंदे सरकार आले असल्याचे स्पष्ठ झाले आहे. असे असताना बंडखोर आमदार शहाजी पाटील यांचा फोन कॉल मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. यामुळे त्यांचीच चर्चा सध्या सुरू आहे.
शहाजी बापू पाटील यांच्या 'काय झाडी, काय डोंगर' या डायलॉगचा उल्लेख करत अजित पवारांनी विधानसभेत जोरदार भाषण केले. ते शहाजी बापू तिथं काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल एकदम Ok Ok करत बसले", असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी आपल्या अनोख्या शैलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बंडखोर आमदारांवर जोरदार फटकेबाजी केली. यावेळी एकच हशा झाला.
दरम्यान, अधिवेशन संपल्यानंतर शहाजी बापूंशी संवाद साधला. त्यावर अजित पवारांनी मला खूप प्रेम दिले. शरद पवारांनीही दिले. त्यांच्यासोबत मी जीवनाचे ३५ वर्षे राजकारणात काम केले आहे. तसेच मी अजित पवारांबद्दल कालही, आजही, उद्याही चांगलचं बोलणार असे शहाजी बापू यांनी म्हटले आहे. दादा हे दादाच आहेत, आणि ते कायम दादाच राहतील. मी आयुष्यात शरद पवारांना देखील घाबरलो नाही. पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मी घाबरतो, असेही ते म्हणाले.
बंडखोर म्हणत होते अजितदादा निधी देत नव्हते, दादांनी सगळ्यांसमोर आकडेवारीच सांगितली
दरम्यान, बंडखोर आमदारांच्या चर्चेत शहाजीबापू हे सर्वाधिक चर्चेत होते. त्यांना त्यांच्या मतदार संघातून कार्यकर्त्याने फोन केल्यानंतर कुठे आहेत नेते असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी गुवाहाटी मध्ये असून काय झाडी, काय डोंगर काय हॉटेल असे म्हटले होते, यामुळे हा कॉल सगळीकडे व्हायरल झाला होता, त्यावर गाणी देखील तयार करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या;
मोठ्या मनाचा शेतकरी!! शेतकऱ्यांसाठी राबतोय शेतकरी पुत्र, ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे..
सोलरमुळे आयुष्यच बदलले, 12 एकर शेती झाली हिरवीगार..
शेतीपूरक व्यवसायातून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या नेमकं करायचं तरी काय..
Published on: 05 July 2022, 04:18 IST