News

शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदीची दखल घेत असताना या योजनेमध्ये मराठवाडा विदर्भातील काही जिल्हे तसेच उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Updated on 17 May, 2022 10:44 AM IST

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिकसाह्य करत असते. 'कुसुम सोलर पंप योजना' हीदेखील अनेक योजनांपैकी एक आहे. महाराष्ट्रामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसाह्यातून कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Pump Scheme) राबवली जात आहे.

या योजनेमार्फत पुढील पाच वर्षामध्ये शेतक-यांना 5 लाख पंपाचे ( 5 lakh pumps) वितरण केले जाणार आहे. पहिला टप्पा हा महाराष्ट्रामध्ये 2,750 पंपा करता राबविला आहे. तसेच दुसरा टप्पा हा 50 हजार पंपासाठी राबवण्यास सुरुवात केली आहे. सध्या राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये नोंदणीसाठी कोटा उपलब्ध आहे. याबद्दल आता सविस्तर जाणून घेऊया


या योजनेंतर्गत सुरुवातीला झालेल्या नोंदीमध्ये जवळपास 1 लाख 80 हजार शेतकऱ्यांनी आपली नोंदणी पूर्ण केली असून 1 लाख 66 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदीची दखल घेत असताना या योजनेमध्ये मराठवाडा विदर्भातील काही जिल्हे तसेच उत्तर-मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 85 हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून नोंदणी पूर्ण केली आहे.

यामध्ये बीड, लातूर, नांदेड जिल्ह्यामध्ये 50 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कुसुम सोलर पंप योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2,750 पंपाच्या नोंदणीतील 971 नोंदणी हे मराठवाड्यातून आहे. असं असताना विदर्भातील काही जिल्ह्यांत अमरावती, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागांमधून योजनेकडे पूर्णपणे पाठ फिरवली जात असल्याच समोर आलं आहे.


दुसरा टप्पा सुरू झालेल्या शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन आले असून पुढील शेतकऱ्यांनाही पेमेंटचे ऑप्शन येईल. या योजनेसाठी पात्र असलेल्या 13,300 लाभार्थ्यांना हिस्सा भरण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. शिवाय या शेतकऱ्यांना पैशाचा भरणा करण्यासाठी 31 मे 2022 ही अंतिम मुदत असणार आहे.

या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी. यासाठी https://www.mahaurja.com/meda/ या लिंकवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

'या' जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नोंदणीचे आवाहन -

अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कोठा शिल्लक असल्याने सौर कृषी पंप नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे महाऊर्जाद्वारे या जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन केले करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या
धक्कादायक ! कांदा न विकल्याने शेतकऱ्याने बाजार समितीतीच घेतले विष
Mansoon Update: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 11 जून पर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता
85 हजाराची 'ही' भन्नाट स्कूटर खरेदी करा मात्र 25 हजारात; जाणुन घ्या कुठं मिळतेय ही ऑफर 

English Summary: News work: Take advantage of solar pump scheme today; Registration work started in these district
Published on: 17 May 2022, 10:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)