News

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरवण्यासाठी मोदी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. असे असताना यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना देखील फायदेशीर आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात. मात्र याचे काही नियम आहेत. नियमात बसले तर आपल्याला याचे पैसे मिळतात मात्र अनेकांनी गैरमार्गाने हे पैसे मिळवले आहेत.

Updated on 07 September, 2022 4:31 PM IST

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरवण्यासाठी मोदी सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. असे असताना यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना देखील फायदेशीर आहे. यामध्ये शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जातात. मात्र याचे काही नियम आहेत. नियमात बसले तर आपल्याला याचे पैसे मिळतात मात्र अनेकांनी गैरमार्गाने हे पैसे मिळवले आहेत.

आता शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपण अपात्र असताना देखील पैसे येत असल्याची तक्रार केली आहे. फेसबुक पोस्ट करत ते म्हणाले, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जाणारा दोन हजार रुपयांचा अकरावा हप्ता 31 मे रोजी माझ्या खात्यात जमा झाला. मी लोकसभेचा माजी सदस्य असल्याने या योजनेसाठी केंद्र सरकारच्या धोरणानुसार अपात्र आहे.

असे असताना देखील हा सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा होत आहे. याआधी मी स्वत: ६ हप्ते जमा झालेनंतर १२ हजार रूपयाचा धनादेश शासनास परत करून या योजनेतून मला अपात्र करणेबाबत पत्र दिले होते. तरीही आज अखेर ११ हप्ते नियमीत जमा झालेले आहेत. आज पुन्हा शिरोळ तहसिलदार सौ. अपर्णा मोरे धुमाळ यांना भेटून या योजनेतून अपात्र करणेबाबत सुचविले.

... तर दंड भरावाच लागणार! सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर गडकरींचा मोठा निर्णय

मी वारंवार सांगूनही माझ्या खात्यावर पैसे यायचे थांबत नाहीत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांनी अनेक हेलपाटे घातले तरीसुध्दा त्यांचे पैसे येत नाहीत , काय गौडबंगाल आहे कळत नाही, असे म्हटले आहे. अनेकदा पात्र असूनही योजनेचे पैसे मिळत नाहीत, त्यांनी अपात्र अजूनही त्यांना पैसे मिळत आहेत, यामुळे याची सध्या चर्चा सुरु आहे.

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

या योजनेत खासदार आमदार माजी खासदार तसेच सरकारी नोकरी असलेले याचा लाभ घेऊ शकत नाहीत. मात्र अनेकांच्या खात्यावर याचे पैसे येतात. काहींनी हे माहिती असून देखील लाभ घेतला आहे. आता त्यांच्याकडून वसुली करण्याचे काम सुरु आहे. मात्र राजू शेट्टी यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले जात आहे, ज्याला खऱ्या अर्थाने याची गरज आहे त्याला हे पैसे मिळाले पाहिजेत.

महत्वाच्या बातम्या;
गॅसच्या किमती कमी करून मोदी सरकार देणार सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट? घेतला मोठा निर्णय..
Pune Rain Alert: मुसळधार! बारामतीमध्ये ढगफुटी, पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या माणसाला वाचवले..
राज्य सहकार मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषद दिल्लीत होणार, सहकारासंबंधी मोठे निर्णय होण्याची शक्यता..

English Summary: money does not stop coming my account common farmers play tricks money
Published on: 07 September 2022, 04:31 IST