News

शेतकऱ्यांचे सगळं गणित हे बाजारभावावर अवलंबून आहे, अनेकदा चांगले उत्पन्न मिळवून देखील शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत नाहीत. मात्र अनेक शेतकरी हे चांगले नियोजन करून चांगले पैसे कमवतात. पीक पध्दतीमध्ये बदल केला तर काय होऊ शकते हे जुन्नर तालुक्यातील रोहकडीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. पारंपरिक पिकांना फाटा दिला आहे. त्यांनी भाजीपाल्यातून उत्पन्नात भरघोस वाढ केली आहे.

Updated on 21 June, 2022 4:50 PM IST

त्यांनी आपल्या शेतात कारले लावून त्यातून चांगले उत्पन्न मिळवले आहे. त्यांनी एक एकरात कारल्याची लागवड केली होती. या कारल्याला जागेवर 35 रुपये किलो असा दर मिळत आहे. याचे दर अजूनही वाढण्याची शक्यता आहे. सध्या मुख्य शेतीमलाच्या दरात घट तर भाजीपाल्याला विक्रमी दर मिळत आहे. टोमॅटो 70 रुपये तर कारले 60 रुपये किलो असे बाजारपेठेतले चित्र आहे. यामुळे या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत.

रवींद्र घोलप यांनी मुख्य पिकांचे दर आणि सध्याचे भाजीपाल्याचे मार्केट यामधील दरी ओळखून केवळ एका एकरात कारल्याची लागवड केली होती. त्यांनी सेंद्रिय पध्दतीने कारल्याची जोपासना केली. केवळ सेंद्रिय पध्दतीने कारल्याची जोपसणा केल्याने त्याला अधिकचा दर मिळत आहे. घोलप यांच्या शेतावर व्यापारी हजेरी लावून जागेवर 30 ते 35 रुपये किलो असा दर मिळत आहे.

सरकारकडून महिलांना मोफत मिळत आहेत शिलाई मशीन, जाणून घ्या पात्रता..

घोलप यांनी तीन महिने अथक परिश्रम आणि योग्य नियोजन करुन त्यांनी ही किमया साधली आहे. निसर्गाचा लहरीपणा असताना पाण्याचे योग्य नियोजन आणि खताचा डोस यामुळे हे साध्य झाले आहे. या दरम्यानच्या काळात घोलप यांनी इतर कोणत्याही पिकांची लागवड केली नाहीतर केवळ कारल्याचे उत्पादन वाढीवर भर देण्यात आला होता. यामुळे आता त्यांना चांगले पैसे मिळत आहेत. सध्या बाजारपेठेत कारल्याची आवक सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या;
आता लाल मुंग्याची काळजी करू नका! 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
वय ७८ पण कामाचा तोच जोश आणि तोच उत्साह!! आजींकडून भात उत्पादनासाठी शेतीची मशागत
शेती हा बांधावरुन करण्याचा विषय नाही तर..., बिजमाता राहिबाईंचा मोलाचा सल्ला

English Summary: Millions earned from Karalya! Harvest days for farmers at increased rates along with production
Published on: 21 June 2022, 04:50 IST