News

जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदाची सूत्रे सांभाळताच त्यांनी चेअरमनाच्या दालनात असलेला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचा फोटो हटविला आहे. यामुळे आता नवीन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

Updated on 19 December, 2022 10:02 AM IST

जळगाव जिल्हा दूध संघाच्या चेअरमनपदी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमनपदाची सूत्रे सांभाळताच त्यांनी चेअरमनाच्या दालनात असलेला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचा फोटो हटविला आहे. यामुळे आता नवीन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या या दूध संघाच्या (Jalgaon Dudh Sangh) अध्यक्षपदी भाजपा आमदार मंगेश चव्हाण ( MLA Mangesh Chavan) यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या ( BJP-Shinde Group) शेतकरी सहकार पॅनलने एकनाथ खडसेंच्या (Eknath khadse) गटाचा पराभव केला होता.

यामुळे हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांनी पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान, जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. अखेर आमदार मंगेश चव्हाण हे दूध संघाचे अध्यक्ष झाले आहेत.

वडगाव बारामतीत जनावरांचा बाजार सुरू, इतर ठिकाणी बंद, शेतकरी संघटना आक्रमक..

त्यांनी दालनात असलेला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचा फोटो हटविला आहे. या निवडणुकीत मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिंदे-भाजप गटाचे तब्बल १६ संचालक निवडून आले होते. तर एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी गटाचे केवळ चार संचालक निवडून आले होते.

25 वर्षांच्या तरुणाने करून दाखवलं! सव्वा एकरात पपईतून 23 लाखांचे उत्पादन

आमदार मंगेश चव्हाण हे एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. जळगाव जिल्हा दूध संघावर तब्बल सात वर्षे एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची सत्ता होती. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते.

महत्वाच्या बातम्या;
गायीचे दूध 90 रुपये, म्हशीचे दूध 100 रुपये प्रतिलिटर दराने पशुपालकांकडून खरेदी करण्याची तयारी
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांच्या कारखान्यांना बिनव्याजी मदत
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचे होणार

English Summary: Mangesh Chavan elected chairman Jalgaon milk union, photo Eknath Khadse..
Published on: 19 December 2022, 10:02 IST