News

यंदा हरियाणातील शेतकऱ्यांना गहू पिकाबाबत असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संयुक्त किसान मोर्चाने या समस्येवर मात करण्यासाठी सरकारकडे गव्हाच्या पिकाला प्रतिक्विंटल ५०० रुपये इतका बोनस देण्याची मागणी केली आहे.

Updated on 04 May, 2022 4:21 PM IST

यंदा हरियाणातील शेतकऱ्यांना गहू पिकाबाबत असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संयुक्त किसान मोर्चाने या समस्येवर मात करण्यासाठी सरकारकडे गव्हाच्या पिकाला प्रतिक्विंटल ५०० रुपये इतका बोनस देण्याची मागणी केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या उन्नतीसाठी, सुखसोयींसाठी सरकार वेगवेगळ्या क्षेत्रात योजना आणत असते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठीसुद्धा सरकार बऱ्याच सरकारी योजना आणत असते. जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारता येईल.

शेतकऱ्यांना आपत्कालीन संकटांमुळे बरचं नुकसान झेलाव लागतं. त्यातल्या त्यात आर्थिक गोष्टींसोबत श्रमिक खर्च देखील वाया जाते. परंतु यावेळी हरियाणातील शेतकर्‍यांना गव्हाच्या पिकात मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. सध्या राज्यात अवकाळी पाऊस आणि उच्च तापमान यामुळे गव्हाचे पीक खराब झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हरियाणातील शेतकरी वर्गाने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. नुकसान भरून काढण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने सरकारकडे प्रति क्विंटल ५०० रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे.

या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी सुमारे 50 ते 60 क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळते. मात्र यंदा तसे झाले नाही. आपत्कालीन परिस्थितीचा बराच फटका या शेतकऱ्यांना बसला आहे. संयुक्त किसान मोर्चा यांच्या म्हणण्यानुसार यंदा शेतकऱ्यांना केवळ ३५ ते ४५ प्रतिक्विंटल गव्हाचे उत्पादन मिळाले आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळेही शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धामुळे भारतासह अनेक देशांना आर्थिक दृष्ट्या बराच तोटा झाला आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाचे भाव अचानक वाढले. मात्र यावेळी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील धान्य बाजारात गेल्या काही दिवसांपासून बाजारात गव्हाची आवक ही जवळजवळ ४५ ते ५० टक्क्यांनी घटली आहे.

दिल्लीच्या नरेला मंडईत गव्हाचा भाव चांगला असल्याने सोनीपत मंडईत गव्हाची आवक कमी झाल्याचेही हरियाणातील काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी नफा मिळविण्यासाठी गव्हाचे पीक घेऊन दिल्लीला जात आहेत.पिकांचे सर्वात जास्त नुकसान होण्यापाठीमागे हवामान हे मुख्य कारण असल्याचेही शेतकरी सांगतात. जेव्हा गव्हाच्या पेरणीची वेळ आली तेव्हा पावसामुळे शेतात पाणी भरले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी उशिराने गव्हाची पेरणी सुरू केली आणि नंतर गव्हाच्या काढणीची वेळ आली तेव्हा उष्णतेने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे पीक चांगले पिकू शकले नाही. यातून शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर वाढतच गेला. आता हरियाणातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींपासून ते इतर अनेक समस्यांपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

महत्वाच्या बातम्या:
खंडपीठात सुनावणी:हंगामाच्या शेवटी 40 टक्के ऊस शिल्लक, केंद्र आणि राज्य सरकारला शपथपत्र दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
Onion Farming : उन्हाळ्यात कांदा पिकाचे व्यवस्थापण; वाचा या महत्वपूर्ण माहितीविषयी
20 वर्षांची शेतीनिष्ठा फळाला; अखेर कृषी सन्मान मिळाला

English Summary: Major damage to wheat crop; Farmers demand bonus from the government
Published on: 04 May 2022, 04:21 IST