News

महादेव जानकर हे माजी दु्ग्धमंत्री होते. त्यामुळे त्यांना (Milk Rate) दूध दराबाबत अभ्यास आहे. यामुळे त्यांनी (Cow Milk) गाईच्या दूध दरात वाढ करण्याची मागणी (State Government) राज्य सरकारकडे केली आहे. हा व्यवसाय करणे अनेकांना सध्या अवघड झाले आहे. ही मागणी त्यांनी गाईची धार काढत-काढत केली असल्याने त्याला वेगळे असे महत्व प्राप्त झाले आहे.

Updated on 23 May, 2022 10:27 AM IST

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते माजी मंत्री महादेव जानकर हे नेहेमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. असे असताना आता गाईच्या धारा पिळत असताना त्यांच्या एक व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरु आहे. महादेव जानकर हे माजी दु्ग्धमंत्री होते. त्यामुळे त्यांना (Milk Rate) दूध दराबाबत अभ्यास आहे. यामुळे त्यांनी (Cow Milk) गाईच्या दूध दरात वाढ करण्याची मागणी (State Government) राज्य सरकारकडे केली आहे. हा व्यवसाय करणे अनेकांना सध्या अवघड झाले आहे.

ही मागणी त्यांनी गाईची धार काढत-काढत केली असल्याने त्याला वेगळे असे महत्व प्राप्त झाले आहे. गाईच्या दुधाच्या फॅट हे 3/5, 8/5 या प्रमाणात मोजले जाते. त्यानुसार दूधाला प्रति लिटर 50 रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. आता त्यांची ही मागणी पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. महादेव जानकर यांनी इंदापूर येथे एका कार्यकर्त्याच्या शेतात जाऊन थेट दूध उत्पादनामागील आर्थिक परिस्थिती समजावून घेतली.

शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय मुख्य जोड व्यवसाय आहे. त्यामुळे याचा आधार मिळाला तरच शेतकऱ्यांच्या उत्पदनात वाढ होणार आहे. गाईला दिवसभर लागणारा चारा, खुराक याचा विचार करता गाईच्या दुधाला 50 रुपये लिटर दर मिळणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांना हा व्यवसाय परवडणारा आहे. शिवाय वाढीव दर मिळाल्याशिवाय दूध व्यवसाय वाढणारही नाही, यामुळे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

13 शेतकऱ्यांची क्रांती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंजिर खाणार भाव, शेतकरी होणार लखपती...

तसेच दिवसेंदिवस पशुखाद्याचे दर हे वाढतच आहेत. पशूखाद्यमध्ये पेंड, सुग्रास, कांडी, कळणा यासारख्या बाबींचा समावेश होतो. 50 किलोच्या खाद्यासाठी शेतकऱ्यांना 1 हजार 600 रुपये मोजावे लागत आहेत. गायीच्या 3/5 व 8/5 या दुधाला एका लिटर ला कमीत कमी 50 रुपये दर मिळाला पाहिजे, तरच शेतकरी जगतील. दुधाचा धंदा हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काही दिवसात शेतकरी अजूनच जास्त अडचणीत येणार आहे.

दुधाला दर चांगला भाव मिळाला तर शेतकरी उद्योग प्रिय बनेल त्यामुळे सध्याच्या मायबाप सरकारने शेतकऱ्याची गाईच्या दुधाला योग्य दर द्यावा अशी मागणी जानकर यांनी सरकारकडे केली आहे. याबाबत जानकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांना विनंती केली आहे.

आता शेती परवडणार!! शेती परवडत नाही म्हणून पठ्ठ्याने बनवला ई-ट्रॅक्टर, एक तास चालवायचा खर्च फक्त 15 रुपये

सध्या दुधाच्या प्रमाण हे कमी होत आहे. ज्यामधून अधिकचा फायदाच नाही तो व्यवसाय शेतकरी करतोयच कशाला अशी दुग्धव्यवसयाची स्थिती झाली आहे. अनेक शेतकरी हे केवळ खतासाठी हा व्यवसाय करतात, मात्र असे केल्यास यामध्ये काहीच परवडत नाही. यामुळे यामधून शेतकऱ्यांना चार पैसे मिळणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.

महत्वाच्या बातम्या;
पेट्रोल- डिझेल स्वस्त, फायदा थेट शेतकऱ्यांचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मारले एका दगडात दोन पक्षी
अतिरिक्त ऊस उत्पादकाने उघड्यावर मांडला संसार, 20 महिन्याचा ऊस झाला तरीही तोड नाहीच
आता निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार! मोदी सरकारने केली तयारी

English Summary: Mahadev Jankar directly presented the economic mathematics of dairy business by twisting the cow's stream, read ...
Published on: 23 May 2022, 10:27 IST