महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातील वाढ भर घालत आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी ओएमसीएसने ( OMCs ) एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली असून प्रति सिलिंडर १०४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही दर वाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यवसायिक सिलिंडरच्या दरात सातत्याने दरवाढ चालूच आहे. एक मार्च दरम्यान व्यवसायिक सिलिंडरच्या दरात जवळजवळ २६८.५० रुपयांची वाढ झाली होती. आणि आता पुन्हा एकदा या व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीमध्ये वाढ झाली असून तब्बल १०४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता व्यवसायिक सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर २,३५५ रुपये इतकी आहे.
सध्या महागाई गगनाला भिडली आहे. सर्वसामान्य लोक या महागाईचा सामना करत आहेत तोच आता व्यवसायिक सिलेंडर मध्ये दर वाढ करण्यात आली आहे. व्यवसायिक लोकांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. पेट्रोल डिझेल च्या दरवाढीमुळे सामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे .सहा एप्रिल रोजी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमध्ये बदल झाला होता.
आता मात्र तो दर स्थिरावला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात देखील वाढ झाली. असाच काहीसा गंभीर परिणाम व्यवसायिक सिलिंडरच्या दरवाढीमुळे होणार आहे. व्यवसायिक सिलिंडरच्या दरात १०४ रुपयांची वाढ झाल्याने आता हॉटेलमधील जेवण देखील महाग होणार आहे.
IOC नुसार, मुंबईत LPG सिलेंडर रिफिल करायचा असेल तर २२०५ ऐवजी २३०७ रुपये खर्च करावे लागणार आहेत. तसेच चेन्नई, तामिळनाडूमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती २४०६ रुपयांवरून २५०८ रुपयांपर्यंत पोहचला आहे. कोलकात्यात २३५१ ऐवजी २४५५ रुपये द्यावे लागणार आहे . तर दिल्लीत १९ किलोचा LPG सिलेंडर रिफिल करायचा असेल तर तुम्हाला २३५५.५० रुपये भरावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे आता हॉटेलमधील जेवण देखील महाग होण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
Cucumber Farming; काकडी लागवड करा आणि हमखास नफा मिळवा वाचा याविषयी सविस्तर
Poultry Farming : 'या' पद्धतीने करा उन्हाळ्यात कोंबड्याचे संगोपन आणि बना अल्पकालावधीत श्रीमंत
भयानक! आपल्या रोजच्या आहारातला 'हा' पदार्थ हृदयविकाराच्या झटक्यास ठरतो कारणीभूत; वाचा कोणता आहे तो पदार्थ
Published on: 01 May 2022, 10:00 IST