News

अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे स्थानिक नागरिकांची बरीच तारांबळ उडाली. पाऊस इतका जोरात होता की अवघ्या 20 मिनिटांत होत्याच नव्हतं झालं. अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर काही भागात दुचाकी वाहने वाहून गेलेल्याच्या घटना घडल्या आहेत.

Updated on 19 June, 2022 3:34 PM IST

Amravati: रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यातील अनेक भागात ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता. मात्र पाऊस लांबणीवर गेल्याचं चित्र दिसत आहे. उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाली असून काही भागात ढगफुटी सदृश्य पावसाला सुरुवात झाली.

अमरावती जिल्ह्यात चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसब्यात मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे स्थानिक नागरिकांची बरीच तारांबळ उडाली. पाऊस इतका जोरात होता की अवघ्या 20 मिनिटांत होत्याच नव्हतं झालं. अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर काही भागात दुचाकी वाहने वाहून गेलेल्याच्या घटना घडल्या आहेत. गावातील रस्त्यांवर नदीसारखे पाणी वाहत होते.

तर दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अमरावतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेकडो क्विंटल शेतमाल भिजला. नेहमीप्रमाणेच या बाजार समितीमध्ये शेतीमाल दाखल होण्यास सुरुवात झाली होती. मात्र सौदे होण्याआधीच पावसाने हजेरी लावली यामध्ये शेतकऱ्यांचे शेतमालाचे मात्र बरेच नुकसान झाले.

त्यातल्या त्यात मुसळधार पावसाने शेतकरीही काही करू शकले नाहीत. एवढंच नाही तर शेतमालाबरोबर व्यापारांच्या साठवलेल्या मालाचेही बरेच नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वाचवण्यासाठी बरीच धडपड केली. मात्र अवघ्या 15 ते 20 मिनिट बरसलेल्या पावसाने सगळंकाही मातीमोल केलं आहे. पावसामुळे पोत्यांसह परिसरात साठवलेल्या मालातही पाणी साचले. त्यामुळे हा बरसलेला पाऊस शेतकऱ्यांसाठी हानिकारकच आहे.

साहेब शेती परवडत नाही; पठ्ठ्याने 'फाईव्ह स्टार हॉटेल'साठी केली कोट्यावधींच्या कर्जाची मागणी

शेतमाल भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पेरणी करायची तरी कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले. मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुचाकी वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.

एवढेच नाही तर स्टेट बँकेसमोर ग्राहकांच्या तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या दुचाकीसुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होत्या मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाहने पाण्यातून बाहेर काढता आले. या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अन्नधान्य तसेच इतर घरगुती साहित्याचेही बरेच नुकसान झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:
अवघ्या पंधरा मिनिटांचा पाऊस; आणि वर्षभराची मेहनत पाण्यात
अरे पावसा आता तरी पड! पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, पावसाअभावी बादलीने पिकाला पाणी देण्याची ओढवली वेळ

English Summary: Loss of millions to farmers; Roadside vehicles were swept away in the water
Published on: 19 June 2022, 03:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)