नांदेड शहराजवळ असलेल्या वापडेवाडीमधील गुलाब पावडे आणि त्यांच्या पत्नी मंजुषा पावडे हे आयटी क्षेत्रातील इंजिनियर आहेत. असे असताना मात्र आज ते शेती करत आहेत. यामुळे मोठे शिक्षण घेऊन त्यांनी शेती करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गुलाब पावडे यांचे शिक्षण B.E तर मंजुषा यांचे शिक्षण B. E (I T) पर्यंत झाले. लग्नानंतर पावडे दांपत्य पुण्यात नोकरीला गेले. दोघांनी पुण्यात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये दहा वर्ष नोकरी केली. नंतर ते हैद्राबादमध्ये नोकरीला गेले.
तिथे काही वर्ष नोकरी केली. पुणे, हैदराबाद सारख्या मेट्रो शहरात त्यांनी मागील काळात 15 वर्ष मोठ्या कंपनीत नोकरी केली. मंजुषा पावडे यांना महिन्याला 1 लाख 20 हजार तर त्यांचे पति गुलाब पावडे यांना जवळपास दोन लाख रुपये इतका पगार होता. कोरोना काळात work फ्रॉम होम सूरु झालं. तेव्हां ते मूळगावी आले.
कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी आडवला मुंबई- आग्रा महामार्ग..
घरी बसून काम करत दोघं शेती देखील बघायचे. शेतीच्या माध्यमातून वेगळं काही व्यवसाय सुरु करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. यानंतर त्यांनी मग शेतीत काय पिकवावं याचा शोध सुरु केला.
त्यांनी शेवग्याच्या शेंगा आणि पाल्याचे काय गुणधर्म आहेत. लागवड कशी करावी, त्यातून उत्पन्न किती मिळेल याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यानंतर दाम्पत्याने नोकरी सोडून स्वतःच्या दहा एकर शेतीमध्ये कुठलंच पीक न घेता शेतात शेवग्याची लागवड केली.
माॅन्सूनची वाट रखडली, शेतकरी चिंतेत...
त्यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती करण्यास सुरुवात केली. हे पावडर मोरिंग्या पावडर म्हणून ओळखलं जातं. मधुमेह साठी हे पावडर अत्यंत गुणकारी आणि रामबाण असल्याच म्हणतात. एक हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.
पावडे दाम्पत्याला आज महिन्याकाठी दीड लाख रुपये उत्पन्न मिळतेय. ते नैसर्गिक शेती करतात. शेवग्याच्या पावडरला मुंबई, पुणे, नाशिकसोबतच दक्षिण राज्यात मागणी आहे.
पावसाच्या अंदाज चुकला, राज्यात मोसमी वाऱ्यांचा प्रवास रखडला, २३ जूनपासून सक्रिय होण्याची शक्यता
जांभळाने शेतकऱ्यांना केलंय मालामाल! एक जांभूळ दहा रुपयाला, किलोचा दर चारशे रुपयांवर..
येत्या आठवड्याभरात ऊसदर नियंत्रण समिती स्थापन करू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...
Published on: 16 June 2023, 02:14 IST