News

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर येत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. यामुळे यावर कायमचा उपाय केला गेला पाहिजे. असे असताना आता कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणााची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Updated on 29 December, 2022 3:34 PM IST

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर येत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. यामुळे यावर कायमचा उपाय केला गेला पाहिजे. असे असताना आता कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणााची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

यावर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारला विचारणा केली आहे. ते म्हणाले, अलमट्टीची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगलीला जलसमाधीच मिळेल. अलमट्टीची उंची वाढवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगणार आहात का? आणि याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहात का? अशी विचारणा राज्य सरकारला केली. यावरून त्यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधले आहे.

भीमा पाटसची गाडी अखेर रुळावर, ८ दिवसात १९ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप, शेतकरी समाधानी

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519 मीटरवरून 524 मीटर करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. महाराष्ट्राच्या सीमेपासून 235 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर कर्नाटकने अलमट्टी धरण बांधले आहे. 

दरम्यान, या धरणामध्ये पाणी साठवण सुरुवात झाल्यापासून 2005, 2009, 2013 आणि 2019 असा चारवेळा महापूर आला आहे. यामध्ये प्रचंड जीवित व वित्तहानी झाली आहे. यामुळे यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

हाडं गोठवणारी थंडी, बिबट्याची भीती, रात्रीची वीज, शेतकऱ्यांची परिस्थिती आहे तशीच..

असे असतानाही कर्नाटक सरकारने या धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हे कोल्हापूर सांगलीसाठी धोक्याचे आहे. यामुळे यावरून राजकारण तापले आहे.

महत्वाच्या बातम्या;
सह्याद्रीचे शेतकरी जगात भारी! कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केले नाशिकच्या शेतकऱ्यांचे कौतुक
जनावरांसाठी सक्षम विमा योजना लवकरच मिळणार, राज्यात २८ हजार जनावरे मृत्युमुखी
कारखाना वाचवण्यासाठी कायपण! शेतकऱ्याने लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र

English Summary: Kolhapur, Sangli water? Movements Karnataka increase height Almatti Dam
Published on: 29 December 2022, 03:34 IST