News

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. या संकटातून शेतकरी मुक्त होण्यासाठी सरकारने धोरणांमध्ये बदल केला आहे.

Updated on 10 May, 2022 3:42 PM IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. पीककर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. या संकटातून शेतकरी मुक्त होण्यासाठी सरकारने धोरणांमध्ये बदल केला आहे. पीककर्जाचा उपयोग व्हावा म्हणून राज्य सरकारने धोरणांमध्ये बदल केला आहे.

अर्थ संकल्प सादर होताच मे महिन्याच्या 1 तारखेपासूनच पीककर्ज वितरणाचे आदेश संबंधित बॅंकांना (Bank Loan) देण्यात आले आहेत. त्यामुळे खरीप (Kharif Season) पेरणी सुरु होण्यापूर्वी ही कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यास त्याचा योग्य वापर होणार आहे. हा बदल यंदाच्या वर्षापासूनच करण्यात आल्याचे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

साखर निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर : शरद पवार

शिवाय शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला लागावे, खत, बी-बियाणे हे कमी न पडू देण्याची जबाबदारी सरकरची आहे. त्याचा वेळेत पुरवठा होईल तुम्ही उत्पादन वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी खरीपपुर्व हंगाम बैठकीत शेतकऱ्यांना केले आहे.

शेतातील दगड गोट्याचे टेंशन विसरा; आली 'ही' मशीन, दोन तासात बाजूला करता येणार दगड गोटे

शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची गरज भासते. जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व पात्र शेतकऱ्याला विहित वेळेत पीककर्ज उपलब्ध होईल, यादृष्टीने संबंधित विभागांनी कर्ज वाटपाचे नियोजन करावे. पीक कर्जासंदर्भात विविध बँकांसोबत समन्वय साधुन त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण होईल, यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.

गाडी घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; भारतीय Tata Nexon कार आता CNG मध्ये उपलब्ध, जाणून घ्या किंमत

ज्या बँकां त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट पुर्ण करणार नाहीत. अशा बँकांमधील शासकीय ठेवी तातडीने काढून घेण्यात याव्यात व या बँकांची तक्रार रिजर्व्ह बँकेकडे करण्यात यावी. शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला वीज जोडणीही वेळेत मिळेल यासाठीही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचनाही पालकमंत्री टोपे यांनी दिली.

पावसासंबंधी निसर्गाचे संकेत कसे ओळखायचे? या विषयी पंजाबराव डख यांनी सांगितली महत्त्वाची माहिती...

नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजना ही शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे. नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजनेच्या माध्यमातुन कृषिविषयक कामांना देण्यात येणाऱ्या पूर्वसंमती मंजुरीमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असुन शेतकऱ्यांना कामांसाठी पूर्वसंमती ही वेळेत मिळाली पाहिजे.

10 रुपयांची नोट 2 लाख रुपयांना विकते; जाणून घ्या विकण्याची सोपी पद्धत

English Summary: Kharif season: Big decision taken by state government for farmers
Published on: 10 May 2022, 03:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)