News

सध्या उसाचा हंगाम सुरू आहे. अनेक कारखाने हे आर्थिक परिस्थितीत अडकले असताना सरकारकडून जवळच्या लोकांच्या कारखान्यांना मदत केली जात आहे. आता सहकारी साखर कारखान्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विस्तार योजनेंर्तगत मदत केली जात आहे.

Updated on 12 December, 2022 1:47 PM IST

सध्या उसाचा हंगाम सुरू आहे. अनेक कारखाने हे आर्थिक परिस्थितीत अडकले असताना सरकारकडून जवळच्या लोकांच्या कारखान्यांना मदत केली जात आहे. आता सहकारी साखर कारखान्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विस्तार योजनेंर्तगत मदत केली जात आहे.

यामध्ये बशासकीय भागभांडवल प्राप्त करून घेणारा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचा कारखाना पहिला लाभार्थी ठरला आहे. यामुळे इतर कारखान्यांचा यामध्ये नंबर लागला नाही.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या कारखान्यांना ३४ कोटी रुपयांचे भागभांडवल राज्य शासनाने मंजूर केले आहे. यामुळे इतर कारखान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यात सध्या २०० साखर कारखाने असून, त्यात १०१ सहकारी साखर कारख्यान्यांचा व ९९ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी १५ सहकारी साखर कारखान्यांची प्रतिदिन १२५० मे. टन गाळप क्षमता आहे.

25 वर्षांच्या तरुणाने करून दाखवलं! सव्वा एकरात पपईतून 23 लाखांचे उत्पादन

दरम्यान गाळप क्षमता अत्यंत कमी असल्याने अशा कारखान्यांकडून उत्पादित होणारी साखर व इतर उपपदार्थ तयार होण्याचे प्रमाण इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी आहेत. तसेच त्यांचा उत्पादन खर्चही जास्त आहे.

असे असताना आर्थिकदृष्टय़ा हे कारखाने सक्षम नाहीत. राज्यातील अशा १२५० मे. टन गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांची दुप्पट म्हणजे २५०० मे.टन इतकी गाळप क्षमता वाढविण्यासाठी सहकारी साखर कारख्यांनांचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचे होणार

राज्यात असे १५ कारखाने आहेत. त्यात मंत्री शंभूराजे देसाई यांचा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर, ता. पाटण, जिल्हा सातारा आणि शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. किल्लारी, ता. औसा, जिल्हा लातूर या दोन कारखान्यांचा समावेश आहे.

दरम्यान, या योजनेनुसार शासकीय भागभांडवल मिळविण्यास हे दोन कारखाने पात्र ठरले आहेत. या दोन कारख्यान्यांना ३४ कोटी ६ लाख ९६ हजार रुपये शासकीय भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
110 कारखान्यांनी दिली नाही एकरकमी एफआरपी, सरकारचे लक्ष आहे का?
शेतकऱ्यांनो जुनी विहिरींच्या दुरुस्तीसाठी मिळणार 50 हजार रुपये, वाचा सविस्तर..
शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या 'त्या' शेळीची माहिती..

English Summary: Interest-free assistance factories people close Chief Minister Deputy Chief Minister
Published on: 12 December 2022, 01:47 IST