News

यावर्षी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. पाण्याची चांगली उपलब्धता आणि कांद्याचे भाव बर्यापैकी टिकून होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा कांदा लागवड क्षेत्रात वाढ होण्यावर झाला.

Updated on 19 April, 2022 10:21 AM IST

यावर्षी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. पाण्याची चांगली उपलब्धता आणि कांद्याचे भाव बर्‍यापैकी टिकून होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिपाक हा कांदा लागवड क्षेत्रात वाढ होण्यावर झाला. 

लाल कांद्याचे बाजार भाव बऱ्यापैकी स्थिर होते परंतु आता उन्हाळी कांदा बाजारपेठांमध्ये दाखल होत असल्याने मागील आठवड्यापासून कांद्याच्या बाजार भावा मध्ये सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातअक्षरशः पाणी येण्याची स्थिती उत्पन्न झाली आहे.

नक्की वाचा:आनंदाची बातमी : आता सोने तारण ठेवून मिळणार शेतीसाठी कर्ज

याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयातर्फे ग्राहकांच्या हितासाठी नाफेड व महाएफपीसीचा महाओनियन उपक्रमाच्या माध्यमातून अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीला मध्य प्रदेश आणि गुजरात मधील बाजार समित्यांमध्ये शनिवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच लासलगाव बाजार समितीत देखील शनिवारी पहिल्या दिवशी या माध्यमातून दीडशे क्विंटल कांद्याची खरेदी करण्यात आली. यामध्ये कांद्याला कमाल1197 रुपये प्रति क्विंटल तर किमान एक हजार पंधरा रुपये तर सरासरी 1141 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

पूर्ण देशाचा विचार केला तर कांद्याचा पुरवठा खूपच अधिक प्रमाणात होत असल्याने  दिवसागणिक कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. त्यामुळे कांद्याचे बाजार भाव हे एक हजार रुपयांच्या आत आहेत. परंतु या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल असे चित्र आहे. याचे जर उदाहरण घेतले तर नांदगाव तालुक्यातील बल्हेगाव येथील अनिल ताडगे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला गुरुवारी च्या तुलनेत शनिवारी लासलगाव बाजार समितीत विक्री केलेल्याकांद्याला चांगला भाव मिळाला.

नक्की वाचा:बातम्या आनंदाची! कृषी खात्याकडून लवकरच भरली जाणार रिक्त पदे, शासनाकडून निर्बंध शिथिल

गुरुवारी त्यांनी जो कांदा विकला त्या कांद्याला 965 रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला तर लासलगावला नाफेडतर्फे विक्री केलेल्या कांद्याला 1141 प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. 

त्यामुळे या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.याविषयी बोलताना लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप म्हणाल्या की, शनिवार पासून लासलगाव बाजार समितीत नाफेड तर्फे कांदा खरेदीला सुरुवात झाली. या निर्णयामुळे व्यापारी आणि नाफेडमध्ये स्पर्धा निर्माण झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होईल.

English Summary: in lasalgaon marker comitee start onion purchasing by naafed
Published on: 19 April 2022, 10:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)