अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं सोन्यासारखं पीक उध्वस्त केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गारपिटी आणि अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अशातच आता बीडच्या एका शेतकरी पुत्रानं आपलं दु:ख मांडत राज्यपाल रमेश बैस यांना थेट रक्तानेच पत्र लिहिलं आहे.
श्रीकांत गदळे असं या शेतकरी पुत्राचं नाव आहे.
काय लिहिलंय पत्रामध्ये
'शेतकऱ्याची व्यथा लिहून पेनाची शाई संपली. लोकशाही जगात शेतकऱ्याच्या पत्राला किंमत नाही, आता किसान पुत्र मी श्रीकांत गदळे लिहतो स्वतःच्या रक्ताने पत्र. माझ्या रक्ताला लोकशाही जगात किंमत आहे का ? या कीसान पुत्राचा राज्यपालांना एक प्रश्न आहे, जर राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे
सर्वगुण संपन्न आहेत तर मग शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत?
राज्यपाल बदलले नविन राज्यपाल आले मग यांना जूने प्रश्न सोडवता येणार का ? असा सवालही श्रीकांत गदळे यांनी त्यांच्या पत्राद्वारे विचारला आहे. अनुदानाची भीक नको. शेतीमालाला योग्य भाव दया. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. या पत्रातून त्यांनी मला आमदार करा मी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करतो, व खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देश बनवतो ही नम्र विनंती. जय किसान' त्यांनी हे पत्र बीडच्या जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केलं आहे.
नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योगातून शेतकरी दाम्पत्याची भरारी
कोण आहेत शेतकरी पुत्र श्रीकांत गदळे?
श्रीकांत गदळे हे केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली या गावचे रहिवासी असून याआधीही त्यांनी एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर राज्यपालांचं कोणतंही उत्तर मिळालं नाही. आता राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनाही श्रीकांतने रक्ताने पत्र लिहिलं असून यावर राज्यपालांकडून काही उत्तर दिलं जातं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक बातम्या:
शेतकऱ्याचा नादच खुळा! पुदिना लागवडीतून कमावला लाखोंचा नफा
Farmer Protest : किसान सभा आक्रमक; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडकणार 'लाल वादळ'
Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात, बळीराजा संकटात
Published on: 26 April 2023, 03:14 IST