गेल्या काही दिवसांपासून अनेक साखर कारखाने अडचणीत आले आहेत. काही कारखाने तर बंद पडले असून शेतकऱ्यांना पैसे देखील दिले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मात्र काही कारखाने व्यवस्थित सुरू आहेत.
आता कोल्हापूर जिल्ह्यातील क्रांती साखर कारखान्याने शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. क्रांती कारखाना शेतकऱ्यांना FRP पेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना देत आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहेत.
क्रांती कारखाना शेतकऱ्यांना FRP पेक्षा 80 रूपये जास्त देत आहेत. यातले 40 रूपये विकास निधी म्हणून तर उरलेले 40 रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीआधी जमा केले जाणार आहेत. यामुळे इतर कारखान्यांपुढे या कारखान्याने आदर्श ठेवला आहे.
शेतकरी आता पीक नुकसानीचा स्वताच पंचनामा करणार, कोणीही राहणार नाही मदतीपासून वंचीत
याबाबत आमदार अरूण लाड यांनी माहिती दिली. कारखान्याची 2975 रूपये एफआरपी असताना यावर्षी 3055 रूपये देत आहोत, असे लाड यांनी म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
जमिनीचे भूसंपादन नाही शेतकऱ्यांना पैसे नाहीत, तरीही महामार्ग तयार
दरम्यान, कारखान्यानी 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. शेती आणि शेतकऱ्यांवर किती संकटे आली तरी कारखाना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही अरूण लाड म्हणाले. सध्या महागाई वाढल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे.
महत्वाच्या बातम्या;
Corteva बीजप्रक्रियामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान लाँच करणार- डॉ. प्रशांत पात्रा
ब्रेकिंग! आता डिसेंबरपर्यंत मोफत रेशन मिळणार, 80 कोटी लोकांना होणार फायदा, मोदी सरकारची घोषणा
केंद्र सरकारची घोषणा! शेतकऱ्यांना देणार 5 लाख, वाचा काय आहे योजना..
Published on: 29 September 2022, 12:28 IST