परतीच्या पावसाचे जोरदार चक्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच आहे मात्र आता पावसाने कांदा (Onion) खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही सोडले नाही. मुसळधार पावसामुळे व्यापाऱ्यांनी साठवलेला कांदा (Stored onion) कागदासारखा पाण्यावर तरंगत होता.
हवामानाच्या अनिश्चिततेने यावेळी शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कधी दुष्काळामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रातील (Maharashtra) औरंगाबाद, कोपरगावमध्ये जवळपास तीन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.
पाण्यावर कागदासारखा तरंगला कांदा
कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाट्याजवळील नऊ ते दहा शेडमध्ये कांदा व्यापाऱ्यांनी ठेवलेला कांदा पावसाच्या (Onion soaked in rain) पाण्यात बुडाला. त्यामुळे व्यापाऱ्यांचे तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले. शेडमध्ये पावसाचे पाणी शिरताच आत ठेवलेले कांदे पाण्यात तरंगू लागले.
दिलासादायक! दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल डिझेल स्वस्त; पहा किती रुपयांनी झाले स्वस्त
3-4 कोटी रुपयांचे नुकसान
अनेक क्विंटल कांदा वाया गेल्याने व्यापाऱ्यांनी (Onion trader) आता सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. सरकारने आर्थिक मदत न केल्यास ते व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पाडतील, असे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रत्येक कांदा व्यापाऱ्याचे २५ लाख ते ७० लाखांचे नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 8 ते 10 शेडमध्ये सुमारे 3 ते 3.50 कोटी रुपयांचा कांद्याचा माल होता, तो पूर्णपणे खराब झाला आहे.
चार दिवसानंतरही पीएम किसानचे पैसे आले नाहीत? त्वरित येथे करा कॉल, मिळतील पैसे
कांदा व्यापारी काय म्हणत आहेत
पुढील 1 आठवडा बाजार बंद राहणार असल्याने कांदा व्यापाऱ्यांनी शेडमध्ये साठवून ठेवल्याने वाया गेल्याचे कांदा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. आता या व्यावसायिकांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अगोदरच कवडीमोल दराने विकला जात असलेला हा कांदा आता पाण्यात तरंगत आहे, आता तो विकत घ्यावासा वाटणार नाही.
महत्वाच्या बातम्या:
Supriya Sule: शेतकऱ्यांकडं ना झाडी, ना हॉटेल ना 50 खोके; सुप्रिया सुळेंचा सरकारला टोला
मानलं भावा! जर्मनीतील लाखोंची नोकरी सोडून पिकवतोय वाटाणा; शेतीतून करतोय करोडोंची उलाढाल
Published on: 21 October 2022, 02:59 IST