गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर परिसरात चांगला पाऊस पडत आहे. यामुळे आज खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. अजूनही पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे. यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे आता पिण्याच्या पाण्याची, आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अजूनही परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.
आता खडकवासल्यातून उजव्या कालव्यात 905 क्यूसेस एवढे पाणी सोडले जात आहे, तसेच नदीत 2568 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजवर एकूण पाऊस 225 मिमी एवढा झाला आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. परिसरात शेतीच्या कामाला देखील वेग आला असून भात लागवड केली जात आहे.
पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग वाढवण्यात येईल. पाऊस कमी झाल्यास विसर्ग कमी करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच नदीकाठच्या लोकांना सतर्ककेचा इशारा देण्यात आला आहे. मागील तीन दिवस खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत होता. परिणामी खडकवासला धरणातील उपयुक्त पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या धरणावर पुणे शहर आणि परिसर अवलंबून आहे.
शेतकऱ्यांनो शेणापासून कागद आणि लाकूड बनवण्याचा व्यवसाय करा सुरु, मिळेल बक्कळ पैसा..
सोमवारी संध्याकाळी पाच वाजता १.४९ टीएमसी म्हणजे ७५.६० टक्के पाणी साठा जमा झाला होता. पाऊस सुरू होता. धरणात येवा ही वाढला होता. पावसाचा जोर पुढील पाच सहा तास कायम राहिला आणि आता धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या अकरांपैकी तीन दरवाजे एक एक फुटाने उघडली आहेत.
महत्वाच्या बातम्या;
उपवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही, संधोधनातून आली महत्वाची माहिती
'एकनाथ शिंदेंप्रमाणे आमदार फोडा आणि मुख्यमंत्री बना'
आता रेशन कार्डधारकांना दरवर्षी मिळणार मोफत LPG सिलिंडर, वाचा कुठे सुरु झाली ही योजना..
Published on: 12 July 2022, 01:39 IST