काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवस देशातील अनेक राज्यात मुसळधार आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवस उत्तर-पश्चिम भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहू शकते.
अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. गारपिटीमुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान होऊ शकते. पावसामुळे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या पुढे जाणार नाही. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे. आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अर्धापुर तालुक्यातील आंबेगाव,चनापूर, पाटणूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी वाऱ्यामुळं झाडे उन्मळून पडली आहे. केळीच्या बागांना मोठा फटाका बसला.
पुणे बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदार यादी प्रसिद्ध, इच्छुकांची पळापळ
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, मुदखेड तालुक्यात सायंकाळी जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळं रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडी यासारख्या काढणीला आलेल्या पिकांना पावसामुळं फटका बसला आहे.
पुसा कृषी प्रदर्शनात धेनू ॲपचे आधुनिक तंत्रज्ञान ठरले पशुपालकांचे प्रमुख आकर्षण…
पावसामुळे गहू,हरभरा व इतर काढणीला आलेल्या आपले पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरीची लगबग. तसेच गहू पीक काढण्यासाठी हार्वेस्टरला मागणी वाढल्याची चित्र राहाता परिसरात पाहण्यास मिळत आहे.
सेंद्रिय शेती काळाची गरज, अशी करा शेती..
ई-मोजणी क्रांतिकारी, आहेत अनेक फायदे
ईकोदीप निर्मिती उद्योग हा महिला सक्षमीकरणाचा महामार्ग- डॉ.लक्ष्मण प्रजापत
Published on: 17 March 2023, 10:50 IST