News

शेतकरी बंधूना शेतात काम करत असताना साप व इतर अनेक गोष्टींपासून जीवाला धोका असतो. बऱ्याचदा शेतकरी रात्रीच्या वेळी शेत कामासाठी जात असताना त्यांच्यावर वन्यप्राण्यांचादेखील हल्ला होतो.

Updated on 31 May, 2022 5:54 PM IST

Chandrapur: शेतकरी बंधूना शेतात काम करत असताना साप व इतर अनेक गोष्टींपासून जीवाला धोका असतो. बऱ्याचदा शेतकरी रात्रीच्या वेळी शेत कामासाठी जात असताना त्यांच्यावर वन्यप्राण्यांचादेखील हल्ला होतो. काही भागात तर वन्यप्राणांच्या वाढत्या हालचालीमुळे तेथील नागरिकांना धोक्याची घंटा आधीच दिली जाते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वाघाचा वावर वाढला असून नागरिकांवर वाघाचे हल्ले सुरूच आहेत.

सध्या मूल तालुक्यात करवन शेतशिवारात एका वाघाच्या हल्ल्यात शेतकरी रामभाऊ मरापे यांना जीव गमवावा लागला आहे. सध्या खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मशागतीच्या कामाची लगबग सुरु आहे. शेतकरी रामभाऊ मरापे यांची करवन शिवारात शेत जमीन आहे. मंगळवारी रामभाऊ नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान, वाघाने त्यांच्यावर हल्ला केला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.


शेतीकाम करत असताना घडली दुर्घटना
सध्या खरीप हंगामामुळे शेतीत मशागतीची कामे सुरु आहेत. पावसाच्या आत सगळी कामे आटोपून घेण्यासाठी शेतकरी राममभाऊ मरापे हे शेतावर जात होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतात गेले होते. त्याचवेळी वाघाने रामभाऊंवर प्राणघाती हल्ला चढवला. यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. माहिती मिळताच पोलीस, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी हजार झाले. पाहणी करुन पंचनामा करण्यात आला.

कृषी केंद्रांवर कृषी विभागाची करडी नजर; आता 9 भरारी पथक करणार 'हे' काम

या घटनेननंतर संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस प्राणी हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याआधीही अशा घटना घडल्या आहेत. मध्यंतरी तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केला होता. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पती बेपत्ता झाला होता

महत्वाच्या बातम्या:
प्रतीक्षा संपली; मोदींनी पाठवलेले 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; नसतील आले तर करा 'हे' काम
UPSC Result : नादच खुळा: साताऱ्याच्या शेतकरी पुत्राची युपएससी परीक्षेत उत्तुंग भरारी

English Summary: Heartbreaking incidents that took place in the state; Farmer killed in tiger attack
Published on: 31 May 2022, 05:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)