एका बाजूला सरकारकडून सांगितले जाते की खतांचा पुरेसा साठा आहे. असे असताना मात्र अनेक ठिकाणी युरियासाठी शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ येत आहे. आता अमरावती विभागातील धामणगाव रेल्वे, बडनेरा या विभागांत क्षमतेअभावी रेक पॉइंटवर निर्बंध लादण्यात आल्याने पाचही जिल्ह्यांमध्ये युरियाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.
यामुळे गरज असताना शेतकऱ्यांना खते मिळत नाहीत, यामुळे अनेक अडचणी येत आहेत. मेळघाटातील चिखलदरा, धारणी या तालुक्यांमध्ये देखील आदिवासी शेतकऱ्यांद्वारे हरभरा पिकाला युरिया देण्याचे प्रमाण नजीकच्या काळात वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी वाशीम रेल्वे स्थानकावर युरियाची एक रेक दाखल झाली.
या रेकमधील खताचा पुरवठा अकोल्यासह काही जिल्ह्यांना करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, नजीकच्या काळात शेतकऱ्यांकडून हरभरा पिकाला देखील युरिया देण्यावर भर दिला जात आहे. परिणामी, यंदाच्या हंगामात सर्व दूर युरियाची मागणी वाढली आहे.
शेतकऱ्यांनो सौर शेतीत मोठी संधी, केंद्र सरकारचे २५ हजार मेगावॉट सौरऊर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट
असे असताना विदर्भात असलेल्या मोजक्याच रेक पॉइंटवर पाच इतक्या संख्येत रेक बुकिंगची सोय आहे. यामुळे नव्या रेक बुकिंगसाठी रेल्वे नकार दिला आहे. याच कारणामुळे युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे.
केळीच्या दरात मोठी वाढ, उच्चांकी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, यामुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पिके जोमात असताना त्यांना खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सरकारचा दावा देखील खोटा ठरत आहेत. यामुळे शेतकरी नाराज आहेत.
महत्वाच्या बातम्या;
आता सोयाबीनपासून बनवले गुलाबजाम आणि पनीर, शेतकरी बनला लखपती..
देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतोय, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
विजेचे रोहित्र वाहतुकीची जबाबदारी महावितरणचीच, शेतकऱ्यांची होतेय फसवणूक
Published on: 26 December 2022, 10:36 IST