संपूर्ण देशातून दरवर्षी जवळपास ५० हजार मेट्रिक टन आंबा निर्यात केला जातो. तर महाराष्ट्र आंब्याचे आगर असल्याने राज्यातून जवळपास ३५ ते ४० हजार मेट्रिक टन निर्यात होते. तर याबाबत चालू वर्षी आंबा निर्यात वाढावी यादृष्टीने राज्य कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रांवरील सर्व सुविधा गतिमानतेने कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यंदाच्या हंगामात जवळपास २.५ हजार मेट्रिक टन आंबा प्रक्रिया करून निर्यात करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
मुंबई एपीएमसी बाजारात हापूस निर्यातीला नुकतीच सुरुवात झाली असून पाच टक्के हापूस निर्यात होत आहे. यंदा हापूस आंब्यांचे जास्त उत्पादन होईल, अशी आशा व्यापाऱ्यांना होती. मात्र, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने कोकणात अनेक ठिकाणी फळांची गळती झाली आहे. त्यामुळे सध्या तरी आंबा हंगाम कसा असेल हा अंदाज बांधणे सर्वांनाच कठीण झाले आहे. संपूर्ण देशातून सध्या निर्यात वाढीवर भर दिला जात आहे. शिवाय दरवर्षी जास्तीत जास्त निर्यातवाढीचा प्रयत्न देखील होत आहे.
याच निर्यातवाढीसाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांचेमार्फत राज्याचे स्वतंत्र कृषि निर्यात धोरण व निर्यातविषयक चर्चासत्र मागील माहित संपन्न झाले आहे. या चर्चासत्रात पणन संचालक तथा कार्यकारी संचालक, राज्यातील कृषिमालाचे नियातदार, निर्यातदार असोसिएशनचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच शंभरहून अधिक शेतकरी उपस्थिती होते. या कार्यक्रमात निर्यातीबाबत कृषी धोरणांची प्रमुख उद्दिष्टे देखील जाहीर करण्यात आली होती.
राज्यातून हापूस, केशर व उत्तर प्रदेशातील दशहरी आणि चौसा या आंब्यांवर प्रक्रिया करून आंबा निर्यात केला जातो. आंबा निर्यातीसाठी पणन मंडळ, अपेडा, कृषी विभागाच्या सहकार्याने भौगोलिक मानांकन प्राप्त आंब्याच्या निर्यातीसाठी सांघिक प्रयत्न सुरू आहेत. पणन मंडळाच्या सुविधांचा वापर करुन अमेरीका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, युरोप, जपान, न्युझीलंड, साऊथ कोरीया, मलेशिया इ. देशांमध्ये आंबा निर्यात होत असतो. यंदा सुमारे २.५ हजार मेट्रिक टन आंब्यांवर प्रक्रिया करून निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.
तसेच गेल्या वर्षांपासून रशियाला देखील आंबा निर्यात केला जात आहे. मात्र, यंदा रशिया-युक्रेन मधील युद्धामुळे रशियाचा स्विफ्ट प्रणालीमधील सेवांबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध आल्याने निर्यातदारांना आयातदाराकडुन निर्यातीची रक्कम मिळणेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तर युद्धामुळे आंब्याच्या युरोप व अमेरिका येथील निर्यातीवर परिणाम होईल कि काय? असा प्रश्न निर्यातदारांना पडला आहे. तर येत्या काही दिवसात त्याबाबत काय परिस्थिती असेल याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला समोर दिसला बिबट्या आणि.., थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण..
पुन्हा तोच तमाशा..!! तीन महिन्याची मुदत संपल्यावर पुन्हा शेतकऱ्याची वीज तोडणार?
सामाईक हिस्सा, स्वतःचे क्षेत्र, एकट्याला मोबदला नको; महामार्गाचे पैसे आल्याने घराघरात लागली भांडणे..
Published on: 19 March 2022, 10:37 IST