नवी मुंबई : भारत हा शेतीप्रधान देश आहे. ही बाब आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. यामुळे सरकार शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेती व्यवसायातुन अधिकचे उत्पादन मिळावे म्हणुन नेहमीच वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित करीत असते. नुकतेच मोदी सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील करणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे एक शाश्वत मॉडेल विकसित केले जाणार आहे. क्लस्टर बिल्डिंग, क्षमता निर्माण, प्रोत्साहन, मूल्यवर्धन आणि विपणन यासाठी या योजनेद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. रासायनिक मुक्त सेंद्रिय शेतीला क्लस्टर पद्धतीने प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली होती. परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर 50000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
मोठी बातमी! मोदी सरकारच्या 'या' योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार 3 लाखांचे कर्ज; घरबसल्या असा करा अर्ज
यामध्ये 3 वर्षांसाठी सेंद्रिय खते, कीटकनाशके, बियाणे इत्यादी सेंद्रिय साहित्य खरेदीसाठी प्रति हेक्टर 31000 रुपये दिले जातात. याशिवाय 3 वर्षांसाठी मूल्यवर्धन आणि विपणनासाठी हेक्टरी 8800 रुपये दिले जातात. परंपरागत कृषी विकास योजना 2022 अंतर्गत गेल्या 4 वर्षांत 1197 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच क्लस्टर निर्मिती आणि क्षमता वाढीसाठी 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर 3000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेसाठी अर्ज कसा करणार?
»प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
»त्यानंतर होम पेजवर Apply Now वर क्लिक करा.
येथे अर्जाचा फॉर्म उघडेल.
»अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी प्रविष्ट करा.
»त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
»आता सबमिट बटणावर क्लिक करा.
»अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल.
Farming Business Idea: या फळाला आहे मोठी मागणी; लागवड करा आणि कमवा वार्षिक 10 लाख
Published on: 23 May 2022, 12:54 IST