News

कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. असे असताना आता यासाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. सध्याचे (Onion Rate) कांद्याचे दर म्हणजे भिक मागून पैसे घ्यायचे आणि त्या बदल्यात कांदा द्यायचा अशी झाली आहे.

Updated on 07 June, 2022 10:23 AM IST

गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. यामुळे शेतकरी आक्रमक झाला आहे. असे असताना आता यासाठी रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. सध्याचे (Onion Rate) कांद्याचे दर म्हणजे भिक मागून पैसे घ्यायचे आणि त्या बदल्यात कांदा द्यायचा अशी झाली आहे.

कांदा हे उसापाठोपाठचे सर्वात मोठे नगदी पीक असूनही त्याप्रमाणे कधी राजाश्रय मिळाला नाही. या सर्व गोष्टीला जबाबदार राहिले ते (Government) सरकार. कारण आता कांदा दराबाबत कोणते धोरणच ठरविण्यात आलेले नाही, तसेच कांद्याचे दर वाढले तर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात पण घटत्या दराबाबत कोणतीच भूमिका नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

त्यामुळेच सध्या कांदा दराची ही अवस्था झाली आहे. भीकही कांदा दरापेक्षा जास्त दिली जाते अशी अवस्था आहे. कांदा दराबाबत योग्य धोरण ठरविले नाही तर मात्र, राज्याचे कृषिमंत्री यांनाच भीक मागून पैसे देणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे. तसेच आगामी काळात रस्त्यावर उतरुन आंदोलन केले जाणार असल्याची भूमिका सदाभाऊ खोत यांनी घेतली आहे. यामुळे हे आंदोलन पुढे वाढण्याची शक्यता आहे.

कांद्याचा बाजार हस्तक्षेप योजनेत समावेश होणार? शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्याची शक्यता

गतवर्षी कांद्याची लागवड उशिराने झाल्याने कांद्याचे अधिक प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे कांदा प्रश्नाबाबत धोरण तर ठरवावेच लागणार असून निर्यात अनुदान आणि वाहतूक अनुदान निश्चित केल्याशिवाय कांद्याचे दर वाढणार नाहीत, असेही खोत यांनी सांगितले आहे, यामुळे राज्यभऱातील शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वात प्रथम धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे खोत यांनी म्हटले आहे. तरच शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! पेट्रोल डिझेलनंतर आता स्टील आणि सिमेंटचे दरही केले कमी, मोदी सरकारचा मोठा निर्णय...
'गडकरींचे वाक्य मला आठवते की एखाद्याला आयुष्यातून उठवायचे असेल तर त्याला साखर कारखाना काढून द्या'
'पाणी आमच्या छाताडावरून पुढे नेले तर कालवा उडवून देऊ'

English Summary: give money agriculture minister begging get fair price for onion'
Published on: 07 June 2022, 10:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)