शेतकऱ्यांना शेतात मोठ्या प्रमाणावर कष्ट करावे लागतात. असे असताना मात्र त्यांना हवा तेवढा मोबदला मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला जातो. तसेच शेतकऱ्यांना शेताचे आर्थिक बजेट समजले तर त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. केशर देखील याचाच एक भाग आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानसह अनेक राज्यांत त्याची लागवड सुरू झाली आहे. अनेक शेतकरी यामधून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवत आहेत.
केशर शेतीतील नफा पाहता सुशिक्षित तरुणांचा कल याच्या शेतीकडे (Farming) झपाट्याने वाढत आहे. हे शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. केशर इतके महाग आहे की लोक त्याला लाल सोने म्हणून ओळखतात. यामुळे तुम्हाला याची शेती करायची असेल तर चांगले पैसे मिळतील. त्याची किंमत 2.5 लाख ते 3 लाख रुपये प्रति किलो आहे. यामुळे तुम्हाला याचा अंदाज येईल. केशर लागवडीतील कमाई मागणीवर अवलंबून असते.
याला मोठी मागणी आहे, देशातच नाही तर परदेशातही आहे. केशर जगातील सर्वात महाग मसाल्यापैकी एक असल्याचे सांगितले जाते. मात्र याचे उत्पादन तेवढे होत नाही. समुद्रसपाटीपासून 3,000 मीटर उंचीवर त्याची लागवड केली जाते. यासाठी हवामान उष्ण असावे. केशर लागवडीसाठी थंडी व पावसाळा योग्य नाही. त्याच वेळी, त्याच्या लागवडीसाठी वालुकामय, चिकणमाती, असलेली जमीन असणे आवश्यक आहे. यासाठी ते फायदेशीर ठरते.
मोदींचे २ हजार घेणे येणार अंगलट, आता सातबारा उताऱ्यावरच आला बोजा..
जिथे पाणी साचणार नाही, अशी जमीन निवडावी. यासाठी 10 व्हॉल्व्ह बिया वापरल्या जातात, त्याची किंमत सुमारे 550 रुपये आहे. जर तुम्ही दर महिन्याला 2 किलो केशर विकले तर तुम्ही 6 लाख रुपये कमवू शकता. केशर चांगल्या प्रकारे पॅक करून जवळच्या कोणत्याही बाजारात चांगल्या किमतीत विकले जाऊ शकते. लागवडीसाठी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे महिने सर्वोत्तम मानले जातात. तेव्हा चांगले उत्पादन मिळू शकते.
Mansoon 2022: पंजाबरावांचा जून महिन्याचा मान्सून अंदाज जाहीर, शेतकऱ्यांना दिला महत्वाचा सल्ला
केशराच्या झाडांना ऑक्टोबरमध्ये फुले येतात. उंचीवर केशर लावण्यासाठी जुलै-ऑगस्ट हा योग्य काळ आहे, तर मैदानी भागात केशराची लागवड फेब्रुवारी-मार्च दरम्यान केली जाते. याचा अभ्यास करून योग्य नियोजन केले तर तुम्हाला नक्कीच चांगले पैसे मिळणार आहेत. यामुळे हा देखील एक चांगला पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो विजांपासून करा तुमचे संरक्षण, दामिनी अॅपमुळे वाचणार जीव
पाकिस्तानमध्ये वाढतेय गाढवांची संख्या, कारण ठरतंय चीन...
...तर सरपंचांना द्यावा लागणार राजीनामा! महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती
Published on: 13 June 2022, 05:47 IST