राज्यात दिवसेंदिवस कांद्याचे दर (Onion Price) घसरतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा (farmers) खर्चही निघत नाही. कांद्याचे दर वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. शेतकऱ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले जात. खरीप हंगामातील कांदा बाजारात येण्याच्या मार्गावर आहे तरीही मागील वर्षीच्या कांदा (Onion) जाऊनही पडून असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी राग व्यक्त करत आहे. रस्त्यावर कांदा फेकत आहेत तर काही वेळा मोफत कांदा वाटत आहेत.
नाशिकच्या (Nashik) नैताळे येथील शेतकरी संजय साठे (Sanjay Sathe) यांनी कांद्यापासून गणेशमूर्ती (Ganesha Murthy) बनवून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
संजय साठे यांनी कांद्यामध्ये गणेशमूर्ती बनवून कांद्याला दर वाढण्याची प्राथर्ना केली आहे. शेतपिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्याच्या भावामध्ये शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतीमध्ये शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना दिलासा! ई-केवायसी’बाबत केंद्राचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर...
अगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. असे शेतकरी संजय साठे यांनी सांगितले आहे.
तसेच वाशीम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मिळून कांद्यापासून गणेशमूर्तीं बनवली आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगावच्या जय भवानी गणेश मंडळाने 60 किलो कांद्याचे पीक घेऊन गणेशजींच्या मूर्तीची स्थापना केली आहे.
CNG Cars: 8 लाखांपेक्षा कमी किमतीत मिळतायेत या 5 बेस्ट सीएनजी कार
या वेळी विदर्भातील शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक चांगलेच आले. यावेळी बंपर नफा मिळणार असल्याने शेतकरी खूश होते, मात्र नेहमीप्रमाणे यंदाही चांगले पीक आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. बाजारात कांदा तीन ते चार रुपये किलोने विकला जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी वैतागून आपली पिके लोकांमध्ये मोफत वाटली.
महत्वाच्या बातम्या:
नौदलाला मिळाला नवा ध्वज! PM मोदींकडून छत्रपती वीर शिवाजी महाराज यांना समर्पित...
बिग ब्रेकिंग: महाराष्ट्राच्या राजकारणात भुकंप! माजी मुख्यमंत्र्यासह सात आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?
Published on: 02 September 2022, 03:37 IST