News

यावर्षी उन्हाळा हा अधिकच तीव्र होता, यामुळे शेतकऱ्यांनी काही अपेक्षा ठेवून अनेक फळांची लागवड केली होती. यामध्ये कलिंगडाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली गेली. यामध्ये हंगामाच्या सुरुवातीला याला चांगला बाजारभाव मिळाला, मात्र नंतरच्या काळात याच्यात घट होत गेली. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या फळाचा लिलावच झाला नाही. लिलावच झाले नसल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Updated on 21 May, 2022 5:23 PM IST

सध्या निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील दर यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. या हंगामात शेतकऱ्यांनी कलिंगडावर मोठा खर्च केला होता. सुरवातीला कलिंगडला प्रति किलो 15 रुपये असा दरही मिळाला मात्र, वातावरणात बदल, वाढलेली आवक आणि आंबा बाजारात येताच कलिंगडचे दर पडले. सध्या आंबा खरेदी दर आवाक्यात आले आहेत, यामुळे ग्राहक तिकडे वळत आहेत.

यामुळे खरबूज, कलिंगड हे बाजारपेठेतच पडून होते. आतापर्यंत कलिंगड 100 रुपयाला क्रेट तर खरबूज 300 रुपयांना असे दर होत. पण शुक्रावारी बोलीच झाली नाही त्यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाच्या शेवटी फटका बसला आहे. सध्या केवळ जांभूळ आणि डाळिंबालाच अधिकची मागणी होती. सध्या जांभूळाची मागणी वाढली आहे.

आता एलआयसीने फसवले! पाच मोठ्या कंपन्यांमधूनही पडली बाहेर, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले

सध्या अनेक शेतकरी उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रयोग करीत आहेत. मात्र, निसर्गाचा लहरीपणा आणि बाजारपेठेतील दर यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना यावर्षी बाजारपेठा खुल्या असल्याने अधिकचा दर मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र असे घडताना दिसत नाही. आता पाऊस काळ सुरु झाल्याने या फळांची मागणी कमी होणार आहे. कलिंगड बाजारात खरेदीला गेलं की ५० ला एक असा दर घेतला जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
कारखाना आणि उसाच्या शेतातील अंतराने घेतला शेतकऱ्याचा बळी, अंतर होते फक्त २५ किलोमीटर, कारखान्यावर कारवाई करा
7th pay commission: मोठी बातमी! 5 दिवसांत हे काम करा अन्यथा पेन्शन रखडणार, सरकारचा इशारा..
बचत गटातील महिलांनी करून दाखवले! शेतकरी महिला गटाचा तांदूळ, आंबा महोत्सवास मोठा प्रतिसाद

English Summary: Fruits without auction fell in the market committee, went to buy one for 50, how to add
Published on: 21 May 2022, 05:23 IST