News

सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा बसत आहेत. यामुळे शेतीला देखील मोठ्या प्रमाणावर पाणी लागत आहे. असे असताना खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन (Water Cylce) सोडण्याचे ठरले आहे.

Updated on 27 April, 2023 2:07 PM IST

सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या झळा बसत आहेत. यामुळे शेतीला देखील मोठ्या प्रमाणावर पाणी लागत आहे. असे असताना खडकवासला धरणातून मुठा उजवा कालव्याचे सिंचनासाठी १ मे ते १५ जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन (Water Cylce) सोडण्याचे ठरले आहे.

यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे महानगरपालिकेसाठी १५ जुलैपर्यंत ४.५३ टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. खडकवासला प्रकल्पातील (Khadakvasla Dam) ४ धरणांत मिळून २५ एप्रिलपर्यंत ११.६१ टीएमसी पाणीसाठा आहे.

जुना मुठा उजवा कालव्याचे अस्तरीकरण, खडकवासला प्रकल्प ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यंदाच्या पावसाचा अंदाज पाहता धरणातील पाणीबचत करणे आवश्यक आहे.

...तर तुमच्या घरी धुणीभांडी करतो, भाजप नेत्याचे राहुल कुल यांना आव्हान

यंदा हवामान विभागाकडील अंदाज पाहता थोडी टंचाईची स्थिती येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली आहे. शासनपातळीवरून विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत.

चाऱ्याचे नियोजन आताच सुरू केले असून जवळच्या राज्यातून चारा आणण्याविषयी तयारी सुरू आहे. धरणात आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत कसे पुरवता येईल, यादृष्टिनेही नियोजन करण्यात येत आहे.

आता शेतकऱ्यांची बांध कोराकोरी होणार बंद! 1 जुलैपासून होणार 'सॅटेलाईट' जमीन मोजणी

आता पावसाचे आगमन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसामुळे शेतीची कामे देखील शेतकऱ्यांना उरकायची आहेत. कालवे सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी झाली.

आता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होणार कृषी अभ्यासक्रम
आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती उतरल्या, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?
शेतमाल तारण कर्ज योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, शेतमालावर 75 टक्यांपर्यंत कर्ज मिळणार..

English Summary: From Khadakvasal, second summer cycle from May, farmers will benefit..
Published on: 27 April 2023, 02:07 IST