सध्या सर्वांच्या आवडीचा असलेल्या आंब्याचा सिझन सुरु आहे. आंबा कोणाला आवडत नाही, असे शक्यतो होत नाही. अनेकजण या सिझनची वाट बघत असतात. असे असताना आंबा खरेदी करताना अनेकदा फसवणूक होते. यामुळे अनेकांचे नुकसान होते. असे असले तरी गोड आंबे कसे ओळखायचे याबाबत देखील अनेक टिप्स आहेत. यामुळे या माहिती असल्यास तुम्हाला फसवणुकीला सामोरे जावे लागणार नाही.
सुरुवातीला यामध्ये सुगंधानंतर आंब्याचा स्पर्श कसा जाणवतो ते बघा. आंबा हाताला थोडासा मऊसर लागायला हवा. तरच तो घेण्यायोग्य असतो. आंब्याची ओळख म्हणजे त्याचा सुगंध. जर आंब्यातून सुगंध येत असेल तरच तो आंबा खाण्यायोग्य आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवला आहे, हे समजून घ्यावे. आंबा दिसायला केशरी आहे, पण सुगंध येत नसेल तर तो न घेतलेला बरा.याचे कारण ते आंबे रासायनिक पदार्थ टाकून पिकवलेले असण्याची शक्यता अधिक आहे.
आंबा पिकला आहे की नाही, हे पाहण्यासाठी आंब्याचा खालचा भाग म्हणजे देठ जिथे असतं, त्याच्या अगदी विरुद्ध भाग हलकासा दाबून पहा. जर हा भाग सहज दाबला गेला, तर आंबा पिकला आहे, असे समजावे. असा आंबा गोड निघतो. आंब्याचा रंगही अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या आंब्याचा रंग मध्येच कुठेतरी हिरवा आणि बाकी ठिकाणी पिवळट केशरी दिसतो, आहे, असे आंबे घेणं टाळा. ते आंबट निघतात.
ज्या आंब्यांचा रंग सगळ्याच बाजूने एकसारखा असतो, ते आंबे गोड निघतात. ज्या आंब्याचा एखादाच भाग मऊ आणि उर्वरित भाग कडक असतो, असे आंबे घेऊ नका. ते सडके निघण्याची शक्यता जास्त असते. अशा पद्धतीने जर तुम्ही आंबे खरेदी केले तर तुम्हाला तुमचे पैसे वाया घालवले असे कधीच वाटणार नाही. यामुळे तुम्हाला गोड आंब्याची चव चाखायला मिळेल.
महत्वाच्या बातम्या;
भारतातलं पहिलं 'मधाचं गाव' महाराष्ट्रात, शेतकरी कमवतात लाखो रुपये, जाणून घ्या...
मोदींचा एक निर्णय आणि जगात मोठी खळबळ, आंतरराष्ट्रीय बाजारात घडणार मोठ्या घडामोडी...
मोठ्या लोकांना सोडता आणि शेतकऱ्यांना पिडता, न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्रला झापले
Published on: 18 May 2022, 11:25 IST