News

शेती व्यवसायात 'ट्रॅक्टर'चे महत्व हे अनन्यसाधारण आहे. शेतकरी बंधूना ट्रॅक्टरची सुविधा मिळाल्यामुळे त्यांची बरीच कामे जलदगतीने आणि सोयीस्कर झाली. याचेच महत्व ओळखून दरवर्षी 'इंडियन ट्रॅक्टर ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा साजरा केला जातो.

Updated on 19 July, 2022 6:04 PM IST

शेती व्यवसायात 'ट्रॅक्टर'चे महत्व हे अनन्यसाधारण आहे. शेतकरी बंधूना ट्रॅक्टरची सुविधा मिळाल्यामुळे त्यांची बरीच कामे जलदगतीने आणि सोयीस्कर झाली. याचेच महत्व ओळखून दरवर्षी 'इंडियन ट्रॅक्टर ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा साजरा केला जातो. सध्या 'इंडियन ट्रॅक्टर ऑफ द इयर 2022' या पुरस्कार सोहळ्याचे सगळेचजण आतुरतेने वाट बघत होते.

हा पुरस्कार सोहळा म्हणजे ट्रॅक्टर कंपन्यांच्या कठोर परिश्रम आणि प्रयत्नांची प्रशंसा करण्याची दृष्टी असलेली एक अभिनव कल्पना आहे. वार्षिक पुरस्कार सोहळा 20 जुलै 2022 रोजी दुपारी ४ वाजता, पुलमन एरोसिटी हॉटेलमध्ये होणार आहे.या स्पर्धेत विजेता कोण याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

2019 साली दिल्लीतील ट्रॅक्टर जंक्शनने सादर केलेले, ITOTY (भारतीय ट्रॅक्टर ऑफ द इयर) रजत गुप्ता यांनी विकसित केले होते. ट्रॅक्टर कंपन्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करणे हा यामागचा उद्देश आहे.या वर्षी इंडिया ट्रॅक्टर ऑफ द इयरची तिसरी आवृत्ती आहे .

या कार्यक्रमाचे कव्हरेज कृषी जागरण मीडिया हाऊस करणार आहे. कृषी जागरण हे देशातील सर्वात मोठे बहुभाषिक कृषी-ग्रामीण मासिक, लिमका बुक ऑफ रेकॉर्ड विजेते आहे. या कार्यक्रमात FADA संस्थात्मक भागीदार आहेत तर CRISIL हे Agri Insight Partner आहेत, आणि सोबतच झी बिझनेस आणि कृषी जागरण हे अनुक्रमे टेलिकास्ट पार्टनर आणि मीडिया पार्टनर आहेत.

ट्रॅक्टर व्यवसायातील व्यावसायिक 'ITOTY 2022' ट्रॅक्टर पुरस्काराचे विजेते निवडतील. ITOTY ज्युरी सदस्य योग्य फेरी आणि मतदान प्रक्रियेनंतर योग्य विजेत्याची निवड करतात. ITOTY विजेत्यांना त्‍यांच्‍या उत्‍कृष्‍ट कार्यासाठी पुरस्‍कृत केले जाईल जे शेतक-यांना उत्‍तम दर्जाची उत्‍पादने पुरविण्‍यासाठी मदत करत आहेत.

'ITOTY 2022' च्या पॅनेल सदस्यांची यादी पुढीलप्रमाणे:

एल.पी. गिते ( ICAR - CIAE भोपाळ सुपरअन्युएटेड सायंटिस्ट )

अरिंदम मौलिक ( ट्रॅक्टर आणि ऑटोमोबाईल उद्योगात ३८ वर्षे )

यश जाट ( यूट्यूब चॅनल: माय किसान दोस्त )

पीके वर्मा ( फार्म मशिनरी आणि पॉवरमध्ये ४० वर्षांचा अनुभव )

हेमंत जोशी ( 32 वर्षे फार्म मशिनरीसह )

आशिष भारद्वाज ( भारतीय ट्रॅक्टर MNC मध्ये 20 वर्षे )

सीआर मेहता ( आयसीएआर-सीआयएई, भोपाळ येथे २९ वर्षे )

पॉल राज ( ट्रॅक्टर उद्योगातील ४० वर्षांचा अनुभव )


माननीय ज्युरी सदस्य खालील विषयांवर चर्चा करतील:

भारताला कृषी यांत्रिक देश होण्यापासून काय रोखते

फार्म मशिनरी आणि सोल्यूशन्समध्ये उदयोन्मुख ग्राहकांच्या अपेक्षा

पुढील पाच वर्षात कृषी यांत्रिकीकरणाचा कल

या वर्षीचा तिसरा ITOTY पुरस्कार कोण जिंकणार आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या संपर्कात रहा

महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! आता मोबाईल अ‍ॅपवर करा जनावरांची विक्री, दुधाचे प्रमाणही समजणार
पाऊस झाला शेतकऱ्यांचा वैरी; लाखो हेक्टरवरील पिके पाण्याखाली, मायबाप सरकारकडे मदतीची मागणी

English Summary: Finally the wait is over; 'Indian Tractor of the Year' award to be announced tomorrow; Got curious
Published on: 19 July 2022, 06:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)